Ajit Pawar Video Viral : कार्यकर्त्याच्या गाडीला होतं एकच सीट; अजित पवार म्हणाले मैत्रिणीला...

Ajit Pawar Video Viral
Ajit Pawar Video Viralesakal
Updated on

पुणेः मागच्या दोन आठवड्यांपासून अजित पवारांची राज्याच्या राजकारणामध्ये तुफान चर्चा आहे. आज पवार पुणे दैऱ्यावर आहेत. एका कार्यकर्त्याने नवीन घेतलेल्या दुचाकीवरुन एक मिश्किल टिपण्णी पवारांनी केली अन् एकच हशा पिकला.

अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमधून सुरु आहेत. त्याला संजय राऊतांच्या रोखठोकमधील लेखही कारणीभूत ठरला. मात्र अजित पवारांनी भाजप प्रवेशाच्या वावड्या असल्याचं म्हणून संजय राऊतांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

संजय राऊतांनी जशात तसं उत्तर देऊन वाद भडकवला. आज 'कोण संजय राऊत?' असं म्हणून त्यांनी राऊतांना चिमटा काढला आहे. राज्यात अजित पवारांवरुन राजकारण पेटलेलं असतांना दुसरीकडे मात्र त्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांमध्ये हास्यविनोद केले.

Ajit Pawar Video Viral
Pawar Vs Raut : 'शरद पवारांच्या सांगण्यावरुनच संजय राऊत हे अजितदादांना...' भाजप खासदाराचं खळबळजनक विधान

त्याचं झालं असं की, पुण्यात एका कार्यकर्त्याची नवीन गाडीची अजित पवारांनी पाहाणी केली. त्या गाडीला एकच सीट होतं. गाडी बघितल्यानंतर त्यांनी '...पण एकच सीट' अशी टिपण्णी केली. उपस्थितांनी 'सिंगल सीट आहे' अशी माहिती दिली. त्यावर पवारांनी 'मैत्रिणीला न्यायचं असेल तर?' अशी टिपण्णी केली. त्यावर एकच हशा पिकला.

अजित पवार हे नर्मविनोद आणि हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. जाहीर सभांमध्ये ते कधी कार्यकर्त्यांचे कान पिळतात तर कधी विनोदाने त्याची टोपी उडवतात. आजही पुण्यात त्यांच्या उपस्थितीत हास्यविनोद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com