Pawar Vs Raut : 'शरद पवारांच्या सांगण्यावरुनच संजय राऊत हे अजितदादांना...' भाजप खासदाराचं खळबळजनक विधान

ncp ajit pawar sanjay raut
ncp ajit pawar sanjay rautsakal
Updated on

मुंबईः मागील दोन दिवसांपासून अजित पवार विरुद्ध संजय राऊत असा वाद सुरु झालाय. त्याचं कारणही तसंच आहे. संजय राऊतांनी शरद पवार यांचा दाखला देऊन रोखठोकमध्ये लेख लिहिला होता.

त्यावर अजित पवार यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडावी, इतर पक्षांविषयी बोलू नये असं विधान केलं होतं. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिल. त्यावर आज तर अजित पवारांनी कोण संजय राऊत? असं विधान करुन वाद पेटत ठेवला आहे.

दरम्यान, याच वादावर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी एक विधान केलंय. ते म्हणाले की, शिवसेनेतले ४० आमदार फुटले ते संजय राऊत यांच्यामुळेच. आताही अजित पवार संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडतील.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

खासदार बोंडे पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या सांगण्यावरुनच संजय राऊत हे अजित पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, अजित पवार हेसुद्धा संजय राऊत यांना कंटाळून महाविकास आघाडी सोडून जातील, त्याला जबाबदार संजय राऊत असतील, असा दावा त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना आज प्रश्‍न विचारला असता, कोण संजय राऊत? असा सवाल पवार यांनी केला. एवढेच नव्हे तर, प्रत्येकाने आपापल्या पक्षाचे काम करावे, असा सल्लाही पवार यांनी राऊत यांचे नाव न घेता, त्यांना दिला.

ncp ajit pawar sanjay raut
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास नकार, परवानगी न घेताच सभास्थळ केलं जाहीर

विरोधी पक्षनेते अजित पवार हे शुक्रवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, जिल्हा बॅंकेच्या कामगिरीचा आढावा सादर केला. या पत्रकार परिषदेत पवार यांना संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल केल्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्‍न विचारला असता, त्यांनी हा सवाल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) workers in Sangola performed a symbolic milk abhishek on MP Sanjay Raut's portrait and raised slogans in his support amid the political row over his remarks against Guardian Minister Jaykumar Gore.
BJP workers staged a road blockade and burnt an effigy of Shiv Sena MP Sanjay Raut in Sangola, protesting his remarks against Minister Jaykumar Gore.
First full size statue of Ajit Pawar in Baramati
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com