Maharashtra Politics : "शरद पवारांच्या परवानगीने अजित पवार भाजपात जातील"

"३३ महिन्यांच्या सरकारमध्ये अजित पवारांचा श्वास गुदमरत होता"
ajit pawar, Sharad pawar
ajit pawar, Sharad pawarSakal

अजित पवार हा राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार भाजपासोबत युती करणार अशाही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, एका आमदाराच्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवारांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपात जातील, असा गौप्यस्फोट अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. अजित पवार आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन जाणार आहेत, अशाही चर्चा आहेत. अशातच रवी राणा यांनी हे विधान केलं आहे.

ajit pawar, Sharad pawar
Ajit Pawar यांनी दिवसभरातले कार्यक्रम केले रद्द, राजकीय घडामोडींना वेग

काय म्हणाले आहेत रवी राणा?

"अजित पवार हे ३३ महिन्यांच्या सरकारला कंटाळलेले होते. त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवारांना विश्वास आहे. उद्धव ठाकरेंच्या एकेरी धोरणामुळे अजित पवार कंटाळले होते. त्यामुळे अजित पवार लवकरच भाजपामध्ये जाऊन सरकारला पाठिंबा देतील", असंही रवी राणा म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com