
Shivsena: फडणवीस शिंदेंची मध्यरात्रीची बैठक अन् आता गजानन कीर्तिकरांचा यू टर्न; राजकीय घडामोडींना वेग
शिवसेनेत बंड करून समर्थक आमदार आणि खासदार यांना घेऊन भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन होऊन वर्षही झालं नाही तोवर दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपल्या कुरबुरी ऐकवायला सुरवात केली. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत भाजपची तक्रार केली आहे.(Latest Marathi News)
किर्तीकर यांच्यासह इतर नेत्यांनीही भाजपची तक्रार केली. यामुळे भाजप आणि शिवसेनेते मतभेद निर्माण झाले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला होता यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा भेट झाली होती. यावर प्रतिक्रिया येऊ लागल्याने भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या विधानावरून गजानन कीर्तिकरांनी यू टर्न घेतला आहे.
'भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोललोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं आहे. मी खासदार होतो त्या अडीच वर्षात बीजेपी-शिवसेना युती नव्हती महाविकास आघाडी होती. शिंदे साहेबांनी उठाव करून ती युती प्रस्तावित केली असं शिवसेनेचे नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांनी म्हंटलं आहे. (Latest Marathi News)
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'पुन्हा शिवसेना-बीजेपीच सरकार आलं. मुख्यमंत्री शिंदे झाले. आम्ही एनडीएचे घटकपक्ष म्हणून खासदार वावरत होतो. आम्हला एनडीए घटक पक्षाचा दर्जा नव्हता. आता आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. तो जो फरक आहे. त्याठिकाणच्या केंद्रीय मंत्र्यांना कळला की नाही? हा त्यामागचा बोलण्याचा हेतू होता, असंही गजानन कीर्तिकर पुढे म्हणाले आहेत.
ठाकरे गटाचे 12 आमदार आमच्या संपर्कात- गजानन कीर्तिकर
ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत, 5 खासदार आहेत त्यातील पाच पैकी तीन ते चार लोक तर नाहीच.. त्यातील दोन ते तीन लोक आहेत, त्यांची नाव घेणार नाही, पण ते अजिबात येणार नाहीत, ते मोठे लाभार्थी आहेत. 15 पैकी दोन ते तीन लाभार्थी आहेत ते आमच्या सोबत येणार नाहीत. मात्र 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत.(Latest Marathi News)