esakal | अलिबाग : नैसर्गिक आपत्तीची केंद्रीय पथकाने केली पाहणी | Alibaug
sakal

बोलून बातमी शोधा

Alibaug

अलिबाग : नैसर्गिक आपत्तीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rainfall) तळीये व साखर सुतारवाडी, केवनाळे येथे दरड कोसळून झालेली दुर्घटना आणि महाड, पोलादपूर येथील पुरग्रस्तांना (Maharashtra flood) मिळालेल्या मदतीची पाहणी केंद्र शासनाकडून (central Government) हे आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाने केली. या पथकाने दरडग्रस्त गावांनाही भेट देत तेथील नागरिकांची विचारपूस केली.

हेही वाचा: नवी मुंबई : ऑक्टोबर हिटचा तडाखा; बदलत्‍या हवामानाचा परिणाम

पाहणीनंतर नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकातील केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संचालक अभेयकुमार, केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुभाष चंद्रा, केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त आयुष पूनिया या सदस्यांसमोर चित्रफिती द्वारे दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन याबाबतची संगणकीय सादरीकरणद्वारे सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा: शाळेत असलेल्या कैद्यांमुळे विद्यार्थी माघारी; विलगीकरण कक्ष सुरूच

केंद्र शासनाकडून हे आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक दोन दिवसाच्या पाहणी दौऱ्यावर आले असून रायगड जिल्ह्यामधील 22 जुलै रोजी महाड येथे आलेला महापूर, महाड तालुक्यातील तळीये तसेच पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे येथे झालेले भू:स्खलन व दरड कोसळून झालेली दुर्घटना, या परिस्थितीबाबतचा अभ्यास करून त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी या केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

या पथकातील सदस्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून घडलेली दुर्घटना, दुर्घटनेनंतरचे शोध व बचाव तसेच मदतकार्य, पुनर्वसन कार्य याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी कोकण विभागीय आयुक्त विकास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, उपसंचालक पशुसंवर्धन डॉ.सुभाष मस्के, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुरेश भारती, रोहा उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार दिप्ती देसाई, तहसिलदार विशाल दौंडकर, महाड नगरपालिका मुख्याधिकारी श्री.रोडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच इतर विभागाचे विभाग प्रमुख, स्थानिक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top