चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना कोर्टाचा दणका; 10 लाख भरण्याचे आदेश

प्रिया बेर्डे, अलका कुबल यांचाही यामध्ये सामावेश असल्याची माहिती आहे.
चित्रपट महामंडळ
चित्रपट महामंडळसकाळ

मुंबई : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. पुण्यातील 'मानाचा मुजरा' या कार्यक्रमात लाखो रूपये खर्च केल्याप्रकरणी कोर्टाने तात्कालीन संचालकांना १० लाख ७८ हजार रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रिया बेर्डे, अलका कुबल यांचाही सामावेश असल्याचं समोर आलं आहे.

काही वर्षापुर्वी पुण्यात 'मानाचा मुजरा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये जवळपास ५२ लाख रूपये खर्च केल्याचा आरोप संचालकांवर करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. कोर्टाने आता या प्रकरणावर कार्यवाही करत तात्कालीन संचालकांना १० लाख ७८ हजार रूपये भरण्याचे आदेश दिले असून हे पैसे भरण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

चित्रपट महामंडळ
Navneet Rana : खासदार राणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

दरम्यान, यामध्ये प्रिया बेर्डे, अलका कुबल यांच्यासारख्या अनेक मोठ्या दिग्गजांची नावे आहेत. तर कोर्टाने दिलेल्या मुदतीमध्ये पैसे भरल्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालकांसाठी हा मोठा धक्का आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com