
भिवंडी : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असो किंवा समाजवादी पार्टी यांना कोणत्याही प्रकारचे आरोप आपल्यापर्यंत आले नाही पाहिजे, असे वाटते. आपण तुरुंगात गेलो नाही पाहिजे असा विचार ते करतात. मात्र, आपल्या पक्षातील मुस्लिम नेत्याला तुरुंगात पाठवायला हे मागेपुढे पाठवत नाही. मी कोणावरही आरोप करीत नाही. मी फक्त सत्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. (All parties imprison Muslim community leader Asaduddin Owaisi)
भिवंडीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करू नका असे म्हणतात. त्यांना तुरुंगात टाकू नका अशी विनंती करतात. मी त्यांना विचारू इच्छितो की, त्यांना त्यांच्याच पक्षातील नवाब मलिक (nawab malik) का आठवत नाही. मलिकांना तुरुंगाच्या बाहेर का काढले जात नाही, असा प्रश्नही ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी उपस्थित केला.
शरद पवार हे पंतप्रधानांना भेटले तेव्हा नवाब मलिकांबद्दल बोलायला हवे होते. मात्र, ते शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबद्दल बोलले. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवाब मलिकांपेक्षा जास्त जवळचे झाले आहे. हा यांचा खरा चेहरा आहे, हे लक्षात ठेवा. मी सत्य समोर ठेवण्याचे काम करतो. मात्र, पत्रकार राजकारण करायला सुरुवात करेल, असेही ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.
मलिकांना बाहेर काढण्याबाबत काहीच बोलत नाही
कोणी शिवसेनेची गुलामी करतो तर कोणी मोदीची गुलामी करतो तर कोणी शरद पवार यांची गुलामी करतो. नवाब मलिक संजय राऊत पेक्षा कमजोर आहे? नाही. मुस्लिम असल्याने दुर्लक्ष केले जात आहे. मुस्लिमांना भीती दाखवली की ते आपल्याकडे धावत येईल असे यांना वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना बाहेर काढण्याबाबत काहीच बोलत नाही. यांना नवाब मलिक (nawab malik) का आठवत नाही. निवडणुकीत म्हणणार ओवैसींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कारण, आपल्याला भाजपला हरवायच आहे, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.