

BMC Election BJP Shivsena Formula
ESakal
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीनेही तयारी सुरू केली आहे. यासाठी आज महायुतीची बैठक झाली. यानंतर भाजप नेते अमित साटम आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेने नेते उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. मात्र अजित पवारांची राष्ट्रवादीचा यात उल्लेख करण्यात आला नाही. यावेळी अमित साटमांचे वक्तव्य चर्चे आले आहे.