Amol Kolhe : भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या फर्मच्या उद्घाटनाला खासदार कोल्हे; शेवटी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Kolhe

Amol Kolhe : भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या फर्मच्या उद्घाटनाला खासदार कोल्हे; शेवटी...

जालना - मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यातच अमोल कोल्हे यांनी अनेकदा भाजपच्या नेत्यांचा भेटी घेतल्या आहेत. त्यातच आज खासदार कोल्हे यांनी थेट भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या मुलाच्या फर्मचे उद्घाटन केलं. त्यामुळे अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणारच अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Amol Kolhe news in Marathi)

हेही वाचा: प्रेमाचा करुण अंत! लोखंड कापयच्या यंत्रांनं पत्नीचे पन्नास तुकडे; पोलिसांनी सांगितलं कारण

केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे जालना जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष आहेत. अमोल कोल्हे आज जालन्याला रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी प्रतीक दानवे यांच्या 'करेज' फर्मचे उद्घाटन केले. एकंदरीतच भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या फर्मचं उद्घाटन राष्ट्रवादीचे खासदार कोल्हे यांनी केल्याने पुन्हा त्यांच्या पक्षातराच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितांच्या पुस्तकावरून वाद; SP कॉलेज परिसराला छावणीचं स्वरुप

याआधीही अमोल कोल्हे यांनी रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. अमोल कोल्हे यांनी आपल्या चित्रपटाचे पोस्टर देखील अमित शहांच्या हस्ते प्रकाशित केलं होतं. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आले होते. शिवाय शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन मेळाव्याला कोल्हे यांनी दांडी मारली होती.

दरम्यान कोल्हे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या की ते लगेच व्हिडीओ शेअर करून आपली भूमिका स्पष्ट करतात. मात्र याआधी त्यांनी एका व्हिडीओमध्ये हवा पाहून निर्णय घ्यावा लागतो, अस विधान केलं होतं. एकंदरीतच कोल्हे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये फारसे दिसत नाहीत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.