Amravati Love Jihad : अमरावतीतील 'ती' युवती अखेर साताऱ्यात सापडली

Navneet Rana vs Love Jihad
Navneet Rana vs Love Jihadesakal
Updated on

सातारा : अमरावती येथे कथित लव्ह जिहाद प्रकरणी बेपत्ता असलेल्या तरूणीचा अखेर शोध लागला आहे. संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांनी अमरावती येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. हे प्रकरण दोन दिवसांपासून राज्यात गाजत असताना या मुलीच्या शोधाला यश आलं आहे. साताऱ्यातून एका अनोळखी व्यक्तीने फोन करून या युवतीची माहिती दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या तरूणीला ताब्यात घेतलं आहे.

(Amravati Love Jihad Case)

अमरावती येथून मुस्लीन युवकाने एका हिंदू तरूणीला फसवून तिच्याशी लग्न केल्याचा आरोप असलेली मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर संबंधित तरूणी ही साताऱ्यातून गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या रेल्वे काही काळासाठी थांबवून तपासणी करत सदर तरूणीला ताब्यात घेण्यात आलं असून तिला अमरावती पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

Navneet Rana vs Love Jihad
Rain Updates: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची मदत; मुख्यंत्र्यांची घोषणा

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार खासदार अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला होता. सदर युवकांने तीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहसंस्थाला परवानगी नसताना या विवाह संस्थेने बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील उच्चशिक्षित हिंदू तरुणीला रुग्णवाहिका चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने प्रेम जाळ्यात अडकवून अमरावती येथे आणले. विजय कॉलनी स्थित महेश देशमुख यांच्या चंद्रविला चारिटेबल ट्रस्टकडून दोघांचे लग्न लावले होते. संबंधित संस्थेला आंतरधर्मीय विवाह लावण्याची परवानगी नाही. तरीही महेश देशमुख यांच्या संस्थेकडून बनावट मॅरेज सर्टिफिकेट देण्यात आले होते.

या प्रकरणामध्ये नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. हिंदू तरुणींशी लग्न करून त्यांच धर्मांतरण केलं जातं तसेच त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला जात असल्याचा आरोप राणा यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur Wari Live Updates
Maharashtra Farmer Loan Waiver Third List 2026
CM Devendra Fadnavis Performs Official Vitthal Mahapuja
Dr. Shirish Valsangkar
Marathi News Esakal
www.esakal.com