Amravati Student Scholarship Issue : अमरावतीमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर गंडांतर ; महाविद्यालयांचा हलगर्जीपणा नडणार!

Amravati students scholarship uncertainty : याबाबत समाजकल्याण विभागाकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
Scholarship Applications
Scholarship Applicationsesakal
Updated on

Scholarship Crisis Hits Thousands of Students in Amravati : अमरावतीमध्ये महाविद्यालयस्तरावर तसेच विद्यार्थ्यांच्या स्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयांच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून मुकावे लागणार आहे. याबाबत समाजकल्याण विभागाकडून तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे महाविद्यालयस्तरावर ४०११ तसेच विद्यार्थीस्तरावर २११३ अर्ज प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्र असलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना शासनातर्फे राबविण्यात येतात. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे अनुसूचित जाती प्रवर्गातील ऑनलाइन अर्ज भरण्यास ३० जून २०२५ पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

Scholarship Applications
Rohit Pawar Press : रोहित पवारांनी अजित पवारांना घेवून जाणाऱ्या ‘VSR’ विमान कंपनीच्या मालकाचा 'तो' दावा खोडून काढला अन् म्हटले...

महाडीबीटी प्रणालीवरील २०१९-२० ते २०२४- २५ व गतवर्ष २०२५-२६ या वर्षाचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे महाविद्यालयस्तरावर ४०११ तर २११३ विद्यार्थीस्तरावर अर्ज प्रलंबित आहेत. मागील वर्षी २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण २०८८२ अर्ज नोंदणीकृत झाले होते. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात १७, १३६ नोंदणीकृत विद्यार्थी आहेत, त्यांचे प्रमाण ८२.०६ टक्के एवढे आहे. या अर्जांपैकी विद्यार्थीस्तरावरील ९०५ व महाविद्यालयस्तरावर ३११४ अर्ज प्रलंबित आहेत.

Scholarship Applications
Ranveer Singh Threat : बॉलिवूड हादरलं!, आता रणवीर सिंहला मिळाली जीवे मारण्याची धमकी

त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. ज्या महाविद्यालयाचे २०२५-२६ वर्षातील शुल्क मंजूर नाही त्यांनी सबब महाविद्यालयाच्या पालक विभागाकडून शुल्क लवकरात लवकर मंजूर करण्याबाबतचा पाठपुरावा करावा, अशी सूचना समाजकल्याण विभागाकडून करण्यात आली आहे.

Scholarship Applications
Sunetra Pawar Emotional Post : उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट , म्हणाल्या...

परिपूर्ण अर्ज 'या' कार्यालयाच्या लॉगीनला पाठवावे -

याबाबत समाजकल्याण विभागामार्फत व्हीसी, बैठकी व पत्राद्वारे महाविद्यालय तसेच विद्यार्थीस्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिनला पाठविण्याकरिता यापूर्वी सूचित करण्यात आले होते. महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे महाविद्यालयस्तर तसेच विद्यार्थीस्तरावर अर्ज प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र व परिपूर्ण अर्ज या कार्यालयाच्या लॉगीनला पाठवावे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील नोंदणीकृत अर्जाचे प्रमाण १०० टक्के करावे. असे अमरावतीच्या समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com