अमृता स्वतंत्र; त्या माझं ऐकत नाहीत : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

अमृता फडणवीस या स्वतंत्र आहेत, त्या माझं ऐकत नाहीत. अमृता कधीही कुठल्या गोष्टीसाठी थांबत नाहीत असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

मुंबई : अमृता फडणवीस या स्वतंत्र आहेत, त्या माझं ऐकत नाहीत. अमृता कधीही कुठल्या गोष्टीसाठी थांबत नाहीत असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या स्मारकावरून अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवरून वाद निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीत प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. फडणवीस म्हणाले, 'अमृता फडणवीस या वेगळी एन्टीटी आहेत. त्या मला विचारून ट्वीट करत नाहीत आणि मी सांगीतल्याने त्या थांबत नाहीत'. 

हवा आपलीच रं; ट्रेलरले उडवला धुरळा

अमृता फडणवीस हा त्यांचा निर्णय स्वतः घेतात आणि त्याची किंमतही त्यांनी अनेकदा चुकवलेली आहे. मला वाटतं की, जेवढ्या कालच्या थरावर त्यांच्यावर टीका केली गेली असेल, ट्रोल केलं गेलं असेल तितकं कदाचित कुणाला केलं गेलं नसेल. त्यामुळे तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल काही म्हटलेलं नाही, त्या स्मारकासाठी झाडं तोडणार असा निर्णय झाला त्यावर त्यांनी म्हटलं की मेट्रोसाठी झाडं तोडायला विरोध करता तर तिथे झाडं कशी तोडता. स्मारकाला विरोध केलेला नाही. त्यांचे ट्वीट त्या स्वतः करत असल्याचेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

शिवशेनेशी बोलणी होणार; चंद्रकांत पाटील बोलणार

एखादं ट्वीट करायचं असेल तर इतकं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना प्रत्युत्तर येईल. काही लोकं जाणीवपूर्वक खालच्या दर्जाला जाऊन कमेंट करतील. काही राजकीय पक्षांनीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. गेले पाच वर्षे आम्ही हे सहन केलं आहे. राजकीय जीवनात हे सहन करावंच लागतं, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amruta Fadnavis is independent says devendra fadnavis