'हवा आपलीचं रं...'; ट्रेलरने उडवला 'धुरळा'

टीम ई-सकाळ
Friday, 13 December 2019

- राजकारणाची रणधुमाळी दाखवणारा चित्रपट धुरळा

पुणे : 'धुरळा' चित्रपटाचा टीझर यापूर्वी रिलीज झाला होता. त्यानंतर आता ट्रेलरही रिलीज झाला आहे. राजकारणाची रणधुमाळी दाखवणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पण 'धुरळा' करेल, अशी आशा आता लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धुरळा हा चित्रपट निवडणुकीची रणधुमाळी, प्रचाराची लगबग, राजकीय शत्रुत्व, महिलांचं राजकारणातलं अस्तित्व, विजयाचा गुलाल, राजकारणात डोकावू पाहणारी तरूणाई असे राजकारणाचे विविध रंग या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. अलका कुबल, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सुलेखा तळवळकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसतील. राजकीय भूमिकांमुळे प्रत्येकाच्या अभिनयाचा कस लागलाय.

झी स्टुडिओज, अनिश जोग, रणजित गुगळे यांची निर्मिती असलेला आणि समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखित 'धुरळा' 3 जानेवारी 2020 मध्ये प्रदर्शित होईल. अनेक दिवसांनी मराठीत राजकाराणावर चित्रपट येत असल्याने तो कसा असेल, याकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

हवा कुनाची रं? हवा फक्त आपलीच रं!; टीझरने उडवला 'धुरळा'

लेखक क्षितीज पटवर्धन दिग्दर्शक समीर विद्वांस हे दोघं मिळून महाराष्ट्रात धुरळा उडवून देण्यासाठी तयार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ज्या चित्रपटाने इतका 'धुरळा' उडवला, तो चित्रपट प्रदर्शनानंतर काय कमाल करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कलाकारांची तगडी फौज 'धुरळा' उडवण्यासाठी सज्ज!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Movie Dhurala Trailer Release