शिवसेनेशी बोलणी होणार; चंद्रकांत पाटील बोलणार ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

हे प्रकरण राज्यातील सत्तेचे नाही. हा विषय सांगली जिल्हा परिषदेचा आहे. येथे भाजप आणि शिवसेनेची युती सत्तेत आहे, मात्र नव्या समीकरणांत भाजपच्या हातून सत्ता सटकण्याची दाट शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज कोल्हापूर येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली.

सांगली -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शिवसेनेसोबत बोलणी करण्याची वेळ आली आहे. ते त्यासाठी तयार आहेत. शिवसेना नेत्यांशी ते बोलणार आहेत. भाजपसोबत त्यांनी सत्तेत रहावे, असे आवाहन करणार आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे... 

हे प्रकरण राज्यातील सत्तेचे नाही. हा विषय सांगली जिल्हा परिषदेचा आहे. येथे भाजप आणि शिवसेनेची युती सत्तेत आहे, मात्र नव्या समीकरणांत भाजपच्या हातून सत्ता सटकण्याची दाट शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज कोल्हापूर येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यातर चंद्रकांतदादांनी जिल्हा परिषदेतील संभाव्य सत्तानाट्यात थेट उडी घेतली. भाजपची येथील सत्ता टिकवण्यासाठी ते शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी स्वतः संपर्क साधणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात भाजप सदस्यांसह सहयोगी सदस्यांना विश्‍वासात घेऊन पुढील पावले उचलली जाणार आहेत. 

हेही वाचा - जयंतराव, अर्थमंत्री होऊ नका, या नेत्याने केली होती सूचना 

आपापली बांधणी ताकदीने करण्याची सुचना

कोल्हापूर मुक्कामी आज चंद्रकांतदादांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. बैठकीला माजी मंत्री, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, पदाधिकारी मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी प्रमुख उपस्थित होते. त्यात येत्या काळात राजकारण काय वळण घेईल, याचा अंदाज न बांधता सर्व मतदार संघात आपापली बांधणी ताकदीने करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. काही कारणांनी जिल्ह्यात कमी - अधिक यश आले असले तरी नव्याने लोकांसमोर जावे लागेल. त्यात कमी पडू नका. एकसंघपणे पक्षाची बांधणी करा, नव्या चेहऱ्यांना अधिकाधिक संधी द्या, अशा सूचना त्यांनी केल्या. 

हेही वाचा - खासदार संजयकाका पाटलांसह सात जणांचा दर्जा काढला 

बोलणीची जबाबदारी चंद्रकांतदादांनी स्वीकारली

या बैठकीत जिल्हा परिषदेतील नव्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा विषय समोर आला. भाजपसमोर सत्ता राखण्याचे आव्हान असल्याचे या बैठकीत कबूल करण्यात आले. त्यासाठी सहयोगी पक्षांना विश्‍वासात घ्यावे लागेल, भाजपच्या अंतर्गत गटबाजीला रोखावे लागेल, त्याची जबाबदारी चंद्रकांतदादांनी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुढील आठवड्यात या विषयावर बैठक लावण्याचे नियोजन केले. आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे या दोन शिवसेना नेत्यांचे पाच समर्थक सदस्य आहेत. त्यांचे मत ज्यांच्या पारड्यात त्यांची सत्ता, अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे या दोन नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी स्वतः चंद्रकांतदादांनी घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil Will Take To Shivsena Leader