महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी अमृता फडणवीसांनी केली परदेशात जाऊन पूजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amruta Fadnavis

महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी अमृता फडणवीसांनी केली परदेशात जाऊन पूजा

महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या गटासह उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. यासर्व घडामोडीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या पोस्टने (amruta Fadnavis worships Swaminarayan in London for the stability of Maharashtra politics) सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा: पालकत्व निभावताना... : हारी बाजी को जितना जिसे आता है

अमृता फडणवीस सध्या त्या लंडन दौऱ्यावर आहेत. तेथील काही फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी परदेशातील पहिले सर्वात मोठे हिंदू मंदिराला भेट दिली असल्याची माहिती दिली आहे.

इतकेच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली तसेच, स्वामीनारायण हिंदू मंदिरामध्ये विशेष पुजा केली असल्याचीही माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे.

यासोबतच महाराष्ट्र राज्यातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर 'लोकशाहीचा मंत्र आपण कधीही विसरू नये; लोक आधी, पार्टी पुढे, स्वत: लास्ट '' असा सल्लाही त्यांनी कॅप्शनमध्ये दिला आहे.

भाजपने राजकीय गोंधळात एन्ट्री घेतली. महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावी या मागणीसाठी आम्ही राज्यपालांकडे गेलो असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्रही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या भूमिकेवर ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे.

हेही वाचा: राज्यपाल ठरणार गेमचेंजर, राजभवनाच्या एन्ट्रीमुळे सत्तापालटावर शिक्कामोर्तब

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनीच गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली.

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

Web Title: Amruta Fadnavis Worships Swaminarayan In London For The Stability Of Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top