Solapur : जगू तर सोबत अन् मरुही सोबत! मन सुन्न करणारी घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur news

Solapur : जगू तर सोबत अन् मरुही सोबत! मन सुन्न करणारी घटना

Solapur : चुलीतील ठिगणीमुळे झोपडी पेटली आणि संसाराची राख झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली आहे. एका वृद्ध दाम्पत्य जळून खाक झाले. यानंतर एकच आक्रोश झाला. आयुष्यभर सोबत राहिलेल्या वृद्ध दाम्पत्याने मृत्यू दरम्यान देखील एकमेकांची साथ सोडली नाही. 

बार्शी येथे चुलीतील ठिगणी काळ बनून आली आणि वृद्ध दाम्पत्याची अख्खी झोपडी पेटली. या आगीत वृद्ध दाम्पत्याला देखील मृत्यूने कवटाळले दोघांचाही होरपळून मृत्यू झाला.

बार्शीच्या गाडेगावात राहणाऱ्या कमलाबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या. त्यांनी घरातील चूल पेटवली आणि अंघोळीसाठी पाणी ठेवले. नंतर घाराबाहेर बांधलेल्या म्हशीचा चारा करण्यासाठी त्या गेल्या. म्हशीला बांधत असताना चुलीची ठिगणी पडली आणि झोपडीला आग लागली. 

त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केलं. कमलाबाईचे पती घरात झोपले होते. भर आगीत कमलाबाई पतीला उठवण्यासाठी गेल्या. आगीची तीव्रता वाढत आणि दोघांनाही घराबाहेर पडता आले नाही. गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

कमलाबाई यांचे वय ९० तर त्यांचे पतीचे वय ९५ वर्ष होते. आयुष्यभर सोबत असणाऱ्या या दाम्पत्याने मृत्यूसमोर असताना देखील साथ सोडली नाही. या घटनेमुळे आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :firefire case