खोटे आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांची भुमिका संशयास्पद - अनिल देशमुख

Anil Deshmukh
Anil DeshmukhFile photo

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी सध्या प्रचंड वाढताना दिसत आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या (Nagpur) घरात ईडीने (Enforcement Directorate) छापेमारी केली आहे. त्यावेळी अनिल देशमुख नागपूरात नसून मुंबईत (Mumbai) असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर काही तासांतच अनिल देशमुखांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी (Official Residence) म्हणजे ज्ञानेश्वरी बंगल्यावर (Dynaneshwari Bungalow) ईडीने छापे टाकले. त्यासह, देशमुखांचे वरळीत (Worli) असणाऱ्या निवासस्थानासह मुंबईतील एकूण ४ वेगवेगळ्या ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

Anil Deshmukh
गणेशमंडपांवरून भाजप युवासेनेमध्ये जुंपली

यावर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आज ईडीचे अधिकारी चौकशीसाठी आले होते. ईडीला संपूर्ण सहकार्य केलं आहे आणि इथून पुढेही करत राहू. ते पुढे म्हणाले की, परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी त्यांना आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर आरोप केले आहेत. पदावर असताना केले नाहीत. त्यांना जर आरोप करायचेच होते तर त्यांनी आयुक्त पदावर असताना करायला हवे होते. परमबीर सिंग यांची आयुक्त म्हणून भुमिका संशयास्पद होती.

पुढे त्यांनी म्हटलंय की, सध्या अटकेत असणारे सचिन वाझे, रियाझुद्दीन काझींसह पाच अधिकारी परमबीर सिंग यांनाच रिपोर्ट करत होते. त्यामुळे त्यांच्या या संशयास्पद भुमिकेमुळे त्यांना पोलिस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. सध्या NIA तपास करत आहे. सत्य लवकरच समोर येईल, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com