esakal | सुशांतची आत्महत्या अन् कंगणा राणावतचा वाद; आता या मोठ्या नेत्याने केले वक्तव्य, वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh's big statement on Kangana Ranaut

कंगणा राणावतचे मुंबईबाबतचे वक्तव्य हा विषय आता चांगलाच पेट घेत आहे. महाआघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे चित्र या विषयात तयार होऊ लागले आहे. कंगणाने आता हरियाणातच जाऊन रहावे, असे सल्ले तिला संतप्त मुंबईकर आणि महाराष्ट्रातील लोक देत आहे.

सुशांतची आत्महत्या अन् कंगणा राणावतचा वाद; आता या मोठ्या नेत्याने केले वक्तव्य, वाचा

sakal_logo
By
अतुल मेहेरे

नागपूर : मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलॅंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. मुंबईचे पोलिस दल आणि एकंदरीतच महाराष्ट्राचे पोलिस दल अतिषय सक्षम आहे. विविध तपासांसह कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी काम केले आणि आजही करीत आहेत. अशात ‘मुंबई पाकव्याप्त काश्‍मीर झाल्यासारखे वाटते’ असे वक्तव्य अभिनेत्री कंगणा राणावतने केले. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुढील प्रत्युत्तर दिले.

कोरोनाच्या लढ्यात १६५ पोलिस शहीद झाले आहेत. अशा आमच्या पोलिसांबद्दल कुणी सिने कलावंत अशा प्रकारचे वक्तव्य करीत असेल, तर आम्ही त्याचा धिक्कार करतो. मुंबई आणि राज्य आपल्या पोलिसांच्या हातात सुरक्षित आहे. अशा कलावंतांना असे वाटत असेल की, मुंबई किंवा महाराष्ट्रात ते सुरक्षित नाहीत. तर त्यांना येथे राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे कंगणा राणावत यांचे नाव न घेता गृहमंत्री देशमुख म्हणाले.

वाचा - नागरिकांनो सावधान! हा जीव तुमच्या घरी तर नाही ना? असेल तर आताच काढा बाहेर.. अन्यथा..

‘प्रिय कंगणा, सरकारवर जरूर टीका करावी, पण मुंबई शहराची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरशी करणे हे अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. मुंबईकर म्हणून मला हे अजिबात आवडले नाही. मात्र, तुझ्याकडून आणखी चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणे, हा कदाचित माझा भोळेपणा असू शकेल, असे ट्विटमध्ये रेणुका शहाणे म्हणाल्या.

कंगणा राणावतचे मुंबईबाबतचे वक्तव्य हा विषय आता चांगलाच पेट घेत आहे. महाआघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे चित्र या विषयात तयार होऊ लागले आहे. कंगणाने आता हरियाणातच जाऊन रहावे, असे सल्ले तिला संतप्त मुंबईकर आणि महाराष्ट्रातील लोक देत आहे. त्यामुळे आणखी काही काळ हा विषय तापेल, असं दिसत आहे.

अवश्य वाचा - हे तर जणू तुकाराम मुंढेच! नागपूरच्या नव्या आयुक्तांचा तब्बल ६६ अधिकाऱ्यांना दणका..

हे केले होते वक्तव्य

‘मुंबई पाकव्याप्त काश्‍मीर झाल्यासारखे वाटते’ असे वक्तव्य करून अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई पोलिसांची सुरक्षादेखील नाकारली होती. मुंबई पोलिसांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावत यांना मुंबईत आणि महाराष्ट्रात कुठेही राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

तमाम जनतेचा रोष ओढवून घेतला

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्‍मीरशी करून कंगणाने मुंबईकरांसह राज्यातील तमाम जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. राज्य सरकारमधील सर्वच नेते तिच्या वक्तव्याचा निषेध करून आता तिने मुंबईत राहू नये, असा सल्ला देत आहेत.

हेही वाचा - काय सांगता! जर्मनीने युद्धात शस्त्र म्हणून केला होता डासांचा वापर; जाणून घ्या डासांबद्दलच्या माहिती नसलेल्या गोष्टी

मुंबईत आहात म्हणून सुरक्षित आहात

मनसेनेसुद्धा या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मुंबईत आहात म्हणून सुरक्षित आहात. पाकव्याप्त काश्मिरात असता तर बोलायचं कसं तेही कळलं असतं. फालतू राजकारणासाठी मुंबईची बदनामी सहन केली जाणार नाही’, असे मत मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी व्यक्त केले.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image