Anna Hazare: "...तर शिक्षा झालीच पाहिजे" ; अरविंद केजरीवालांच्या CBI चौकशीवर अण्णा हजारेंची मोठी प्रतिक्रिया!

Anna Hazare
Anna Hazare

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उद्या (रविवारी, १६ एप्रिल) कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान आप पक्षाने सूडाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. तर तपास यंत्रणेने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पुरावे असल्याचा दावा केला आहे. पुराव्याच्या आधारेच समन्स बजावण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवालांच्या चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे.आज तक'शी बोलताना अण्णा हजारे म्हणाले , "काही दोष दिसत असेल म्हणून चौकशी होत आहे. चूक झाली असेल तर शिक्षा व्हायला हवी."

अण्णा हजारे म्हणाले, "मी यापूर्वीही पत्र लिहिले होते, तुम्ही दारूबद्दल का विचार करता. चांगल्या गोष्टींचा विचार करा. पैशासाठी काहीही करणे योग्य नाही. दारूने कधीही कोणाचे भले केले नाही. सीबीआयने काहीतरी पाहीले असेल. त्यामुळे चौकशी सुरू आहे, केजरीवाल दोषी आढळल्यास शिक्षा झाली पाहिजे."

Anna Hazare
Appasaheb Dharmadhikari : विलासरावांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण' स्वीकारला तेव्हा 'लिम्का बुक' रेकॉर्ड झाला होता

अरविंद केजरीवाल माझ्यासोबत असताना त्यांना मी विचार आणि आचरण शुद्ध ठेवा. शुद्ध मार्गावर जा, वाईटाचा डाग नसावा, असे सांगितले होते. सिसोदिया सारखी व्यक्ती तुरुंगात आहे याचे खूप वाईट वाटते. स्वत:साठी नाही तर समाज आणि देशासाठी आपण नेहमीच चांगले असावे, असे देखील अण्णा हजारे म्हणाले.

केजरीवाल यांच्याविरोधात सीबीआयकडे पुरावे -

ईडीच्या म्हणण्यानुसार, समीर महेंद्रू विजय नायर यांच्याशी जवळून काम करत होता आणि राजकारणी आणि मद्यविक्रेत्यांसोबतच्या अनेक बैठकांचा भाग होता. राष्ट्रीय राजधानीतील दारू व्यवसायासंदर्भात केजरीवाल यांनी आंध्र प्रदेशचे खासदार मागुंता श्रीनिवासलू रेड्डी यांची भेट घेतल्याची माहितीही ईडीने दिली होती. त्याचवेळी, दोन प्रमुख साक्षीदारांनी सीबीआयला सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत उत्पादन शुल्क धोरणाची मसुदा प्रत उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला देण्यात आली आणि नंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

Anna Hazare
Ajit Pawar : फडणवीस जादूगार आहेत, भविष्यात काहीही होऊ शकतं; भाजप खासदाराचं खळबळजनक विधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com