Ashadhi Ekadashi 2023 : खास मोठ्या एकादशीसाठी अशी करा उपवास थाळी

Upvas Thali Recipe: आषाढी एकादशीचा उपवास महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात केला जातो.
Ashadhi Ekadashi 2023 Upvas Thali Recipe
Ashadhi Ekadashi 2023 Upvas Thali Recipeesakal

Special Upavas Thali On Maha Ekadashi : महाराष्ट्राचे आद्यदैवत असलेल्या विठू माऊलीचा मोठा उत्सव आषाढी एकादशीला असतो. सबंध महाराष्ट्रच या खास दिवसाने भारावलेला असतो असं म्हटलं तरी हरकत नाही.

त्यामुळे वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशींपैकी इतर कोणतीही एकादशी केली नाही तरी मोठी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचा उपवास बहुतेक घरांमध्ये कुटुंबातले सर्वच सदस्य करतात.

अशावेळी या उपवासासाठी खास पदार्थांची संपूर्ण थाळी, पदार्थ कसे असावे याविषयी जाणून घेऊया.

वरईचा भात

वरई सोनरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये तेल / तूप गरम करून त्यात जीरे घाला. बारीक चीरलेला बटाट घाला. बटाटा नीट शीजू द्या.

आवडीनुसार साधारण अर्धा ते एक चमचा मिरची वाटून घाला. कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवून घ्या. त्यात पाव वाटी शेंगादाण्याचा कुट, मीठ, वरई घाला. गरम पाणी टाका आणि झाकण ठेवून शिजवा.

शेंगदाण्याची आमटी

यासाठी कढईत तेल / तूप गरम करून त्यात जीरे घाला. एक बारीक चिरलेली मिरची. एक चमचा लाल तिखट, दोन चमचे शेंगदाणा कुट, नीट परतवून घेतल्यावर त्यात दोन वाट्या ताक, मीठ, साखर घालून उकळी येऊ द्या.

Ashadhi Ekadashi 2023 Upvas Thali Recipe
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढ महिन्यातल्या एकादशीलाच मोठी एकादशी का म्हणतात?

बटाट्याची भाजी

पॅनमध्ये तेल / तूप गरम करून त्यात जीरे घाला. त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घालून नीट परतवून घ्या. त्यात दोन चमचे शेंगदाणा कुट आणि उकडून मॅश केलेले दोन बटाटे घाला. मीठ घाला आणि नीट मिक्स करून परतून घ्या.

राजगीरा हलवा

एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात एक चमचा बारीक तुकडे करून ड्रायफ्रुट्स घाला. ते नीट परतले की बाजूला काढा. अर्धीवाटी राजगीरा पिठ तुपात भाजा. एक वाटी गरम पाणी घाला.

झाकण लावून वाफ काढून घ्या. नंतर त्यात गरम दूध घालून नीट शिजवा. त्यात अर्धीवाटी साखर, एक चमचा तूप घाला. नीट मीक्स केल्यावर त्यात वेलची पूड आणि परतलेले ड्रायफ्रूट्स घाला.

Ashadhi Ekadashi 2023 Upvas Thali Recipe
Ashadhi Ekadashi 2023: पांडुरंगाला तुळसीच्या मंजिरीचा हार वाहण्‍यामागचे काय आहे वैशिष्‍ट्ये?

साबुदाणा भजी

अर्धीवाटी साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कच्चा बटाटा, एक मिरची, मीठ घाला. थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ५-१० मिनीट झाकून ठेवा. नंतर नीट मिक्स करून गरम तेलात त्याची भजी तळून घ्या.

उपवासाची पूरी

३ बटाटे उकडून खिसून घ्या. पऊण वाटी वरई आणि २-३ चमचे साबुदाणा घालून मिक्सरमध्ये बारीक पावडर करा. ते पिठ बटाट्यांसोबत मिक्स करा.

२ चमचे हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमाचा तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. पाणी न घालता कणीक मळा आणि १५ मिनीटं तशीच ठेवा. हाताला तेल लावून बटर पेपरवर पुरी थापा. ती गरम तेलात नीट तळून घ्या.

थोडे वेफर्स तळून घ्या.

मसाला ताक

एका बाऊलमध्ये अर्धीवाटी दही घाला. नीट फेटून घेत त्यात जीरेपूड, मीठ आणि पाणी घालून नीट फेटून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com