आषाढी वारी! संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्रक आलं; 10 जूनला होणार प्रस्थान

pandharpur vari
pandharpur variesakal

पुणेः संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वेळापत्र संस्थानकडून जारी करण्यात आलेलं आहे. वारकरी वर्षभर आषाढी वारीची आस लावून बसलेले असतात. आता जूनच्या १० तारखेला देहूहून वारी प्रस्थान करेल.

यावर्षी २९ जून रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. त्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र देहू संस्थानने वेळापत्र काढले आहे. यंदाचे पालखी सोहळ्याचे ३३८वे वर्ष आहे. पालखीचं १० रोजी प्रस्थान होईल. २८ जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल. हा १९ दिवसांचा पालखी प्रवास असणार आहे.

pandharpur vari
Go First Airlines : विमानाला नव्हते पायलट, प्रवाशी ताटकळले; महिला आयएएस अधिकारी संतापून म्हणाल्या...

१० जून रोजी दुपारी २ तारखेला पालखीचं प्रस्थान होईल. पहिला मुक्काम इनामदार वाडा येथे होणार आहे. ११ जून रोजी आकुर्डी, १२ जून रोजी नानारपेठ, १३ जून रोजी नानारपेठ निवडुंगा विठ्ठल मंदिरत दिवसभर दर्शन असेल.

बुधवार, दि. १४ जून रोजी लोणीकाळभोर, १५ जून यवत, १६ जून वरवंड, १७ जून रोजी उंडवडी गवळ्याची, १८ जून बारामती, १९ जून रोजी सणसर, २० जून रोजी आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण होईल व मुक्काम.

२१ जून निमगाव केतकी, २२ जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, २३ जून रोजी सराटी, २४ जून रोजी निरा स्नान व तिसरे गोल रिंगण आणि अकलूज येथे मुक्काम.

२५ जून रोजी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल तर रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. २६ जून रोजी सकाळी धावा रात्री पालखी मुक्का पिराची कुरोली येथे होणार आहे. २७ जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व वाखरी येथे मुक्काम.

२८ जून रोजी वाखरीवरुन पालखी पंढरपुरात दाखल होईल. दुपारी उभे रिंगण व त्यानंतर पंढरपुरातील संत तुकाराम महाराज मंदिर येथे पालखी सोहळा होईल. बुधवार, दि २९ जून रोजी तुकाराम महाराज संस्थान मंदिर येथे पालखी मुक्कामी असेल. २९ जून ते ३ जुलै रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महारज संस्थानच्या नवीन इमारतीमध्ये असेल. नंतर परतीचा प्रवास सुरु होईल. १३ जुलै रोजी पालखी देहू येथे विसावेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com