भाजप उद्या मुंबईत भव्य मोर्चा काढणार, शेलारांनी दिली महिती I Ashish Shelar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशिष शेलार

पोलिसांनी या मोर्चा परवागनी दिली नसतानाही मोर्चा काढणार असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

भाजप उद्या मुंबईत भव्य मोर्चा काढणार, शेलारांनी दिली महिती

आजही राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संपावरून भाजपने (BJP) महाविकास आघाडीला धारेवर धरणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आजही भाजपाकडून मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर बसून ही कारवाई पुर्ण व्हावी यासाठी मागणी केली. दरम्यान, मलिकांच्या राजीनाम्याच्या मागीसाठी भाजप उद्या मुंबईत विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती भाजपाचे आशिष शेलार यांनी दिली आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवागनी दिलेली नाही मात्र तरीही भाजप मोर्चा काढणार असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

हेही वाचा: 'मातोश्री'च्या निकटवर्तीयांवर आयटी विभागाची छापेमारी

यावेळी शेलारांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, परवानगी नसली तरी आम्ही विनापरवाना मोर्चा काढणार आहे. न्यायालयही नवाब मलिक यांच्या केसमध्ये सक्षमपणे काम करत आहे. मात्र केवळ लाचारीसाठी सरकारचे मंत्री हा राजीनामा घेत नाहीयेत. मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यात सामील असल्याचं दु:ख होतं आहे. आपासून पालिकेवर आयुक्त राज सुरू झाले आहे. भ्रष्टाचाराचे राज्य बाजूला जाईल अशी अपेक्षा आहे. एक कोटी 40 लाख मुंबईकरावर दोन लाख कोटी रुपये खर्च केले असे शिवसेना सांगत आहेत. स्थायी समिती अध्यक्षांच्या बेनामी संपत्ती वाढली आहे. त्यांनी जाता जाता देखील डल्ला मारला आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. सचिन सावतांनी कलेल्या ट्विटसंदर्भात ते म्हणाले, मी तर महाजनाना कोपरखळी मारली. काँग्रेसचे निडणूकीमध्ये काय होईल ते पाहूया.

हेही वाचा: निकालापूर्वीच काँग्रेसचा यू टर्न; AAP, TMC सोबत युती करण्यास तयार!

Web Title: Ashish Shelar Says Allegations Of Bjp In Mumbai Tomorrow Nawab Malik Topic

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top