esakal | खडसेंच्या नाराजीचे कारण काय? फडणवीस की महाजन?
sakal

बोलून बातमी शोधा

ashok gavhane writes about bjp leader eknath khadse and internal politics

महाजनांच्या बोलण्यानंतर खडसेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्यात बंद खोलीत आज जळगावमध्ये चर्चा झाली. त्यानंतर खडसेंची नाराजी नाही. रोहिणी खडसेंच्या पराभवावर आमच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले होते.  

खडसेंच्या नाराजीचे कारण काय? फडणवीस की महाजन?

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची नाराजी नेमकी कोणावर आहे हे कळायला मार्ग नाही. परंतु ते पक्षाच नाराज असून वेगळी चूल मांडण्याचे संकेत त्यांनी आज (ता.०७) दिले. एकनाथ खडसे यांनी पक्षांतर्गत कारवायामुळे आपली मुलगी रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला असल्याचे सांगितले होते. तसेच, भाजपमध्ये आपल्यासोबत बहुजन नेत्यांचेही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे खडसे यांनी सांगितले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

यावर बोलताना पक्षात कोणीही उमेदवारांना अंतर्गत पाडापाडी करण्याचे उद्योग करीत नाही. अॅड. रोहिणी खडसे, पंकजा मुंडे यांना पाडल्याचा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आरोप चुकिचा आहे. त्यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी नावे जाहीर करावी असे अवाहन माजी मंत्री व पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी केले  होते. मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथराव खडसे गेल्यावेळी फारश्‍या मोठ्या मताधिक्‍यांने निवडून आलेले नाहीत,यावेळी त्या मतदार संघात ते उमेदवार नव्हते,त्यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील उभे राहिले.ते प्रत्येक वेळी विरोधात उभे राहिले आहेत. यावेळी त्यांना शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा मिळाला.त्यामुळे रोहिणी खडसेंना पराभव पत्करावा लागला असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले होते. 

खडसेंनी पाडापाडी करणारांची नावे जाहीर करावी - गिरीश महाजन

महाजनांच्या बोलण्यानंतर खडसेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्यात बंद खोलीत आज जळगावमध्ये चर्चा झाली. त्यानंतर खडसेंची नाराजी नाही. रोहिणी खडसेंच्या पराभवावर आमच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले होते.

तर मला वेगळा विचार करावा लागेल - एकनाथ खडसे

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षातीलच काही व्यक्तींकडून आपल्याला अपमानित करण्यात येत आहे. माझी नोंदही घेतली जात नाही असेही खडसेंनी स्पष्ट केले. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या बोलण्यावरून एकनाथ खडसेंची नाराजी आहे हे स्पष्ट असतानाच खडसेंची नाराजी नेमकी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे की माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हा चर्चेचा विषय आहे.

loading image