esakal | तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा
sakal

बोलून बातमी शोधा

bjp leader eknath khadse statement in jalgaon press conference

जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला.

तर, मला वेगळा विचार करावा लागेल; खडसेंचा बंडाचा पवित्रा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : भाजपमधील नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. आज जळगावमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीला न बोलवता केवळ जळगाव जिल्ह्याच्या आढावा बैठकीला बोलवण्यात आलं. वारंवार पक्षातून, विशिष्ट व्यक्तींकडून असा अपमान होत असेल तर, मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

जळगावमध्ये आज, भाजपची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 'मला कोणत्याही जातीवर बोलायचं नाही; जे घडलं ते पक्षासमोर आलं पाहिजे. दोन खासदारांच्या भाजपला एवढं मोठं यश मिळालं, त्यासाठी ओबीसी नेतृत्वाने घाम गाळला आहे. रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळं भाजपनं ओबीसींना मोठं केलं म्हणण्यापेक्षा या नेत्यांमुळं भाजप मोठा झाला, असं म्हणायला हवं. पक्षानं मला खूप दिलंय. काही मिळालं नाही, असं मला म्हणायचं नाही. पक्षासाठी 40 वर्षे काम केलं आणि कोणताही दोष नसताना माझ्यावर कारवाई का केली?'

आणखी वाचा - नागरीकत्वाच्या टीकेला अक्षयकुमार कंटाळला; घेतला मोठा निर्णय

गोपीनाथ मुंडेवरही अन्याय
एकनाथ खडसे म्हणाले, 'पक्षात केवळ माझ्यावर अन्याय झालेला नाही. तर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाल्याचं मी पाहिलंय. पक्षानं आता कार्यकर्त्यांच्या भावाना समजून घ्यायला हव्यात. मी पक्ष सोडणार नाही. ज्या पक्षासाठी मी माझी 40 वर्षे दिली तो पक्ष मी कसा सोडेन? मी पक्ष सोडणार नाही, हे मी 25 वर्षे सांगत आहे. पण, मला पक्षातून डावललं जात असेल तर पुढं काय करायचं. घरी बसायचं, संघटनेचं काम करायचं की परिवाराचं काम करायचं? असा माझा कार्यकर्त्यांना प्रश्न आहे.'

आणखी वाचा - नेताजींच्या मृत्यूचे गूढ; हाडांच्या डीएनए चाचणीची मागणी

पक्ष सांगेल ते काम करीन
एकनाथ खडसे म्हणाले, 'आज उत्तर महाराष्ट्रची आढावा बैठक होती. पण, मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीलाच बोलवण्यात आलं. पक्षातीलच काही व्यक्तींकडून अपमान करण्यात येत आहे. माझी नोंद घेतली जात नाही. जळगाव, उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. तरीही पक्ष सांगेल ते काम करायला मी तयार आहे. पण, वारंवार माझ्यावर अन्याय होत असेल तर, मीदेखील एक माणूस आहे. मला वेगळा विचार करावा लागेल.'