Thackeray Group Calls Modi Govt ‘Desi British’
esakal
अॅड. असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. मुंबईतल्या वरळीत आयोजित कार्यक्रमामध्ये असिम सरोदे यंनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून मोदी सरकारवरवर जोरदार टीका करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारला देशी ब्रिटिशांनी उपमा दिला आहे.