
“Coastal farmers surveying rain-damaged fields — the controversy over Babasaheb Patil’s loan waiver remarks intensifies”
esakal
Summary
विरोधकांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे सांगत सरकारवर टीका केली.
पाटील यांनी निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्वासनांचा उल्लेख करून मतदारांवरही टिप्पणी केली.
याआधी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही राजकीय खळबळ माजली होती.
राज्यात अतिवृष्टीने शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी आणि विरोधी पक्षांनीही केली आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणूक काळात दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करुन दिली जात आहे. सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेजही जाहीर केले आहे. पण अशातच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना राग अनावर झाला आहे.