Bacchu Kadu News: "माझ्या ऐवजी या आमदाराला करा राज्यमंत्री.." बच्चू कडू यांनी मंत्रिपदावरचा दावा सोडला

Maharashtra Politics : बच्चू कडू यांनी आज भूमिका स्पष्ट केली आहे. "मुख्यमंत्री अडचणीत आहेत, मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मी मंत्रिपदाचा दावा सोडत आहे, हे मी आज जाहीर करतो. मला मंत्रालय दिलंय त्यामुळं मी दावा सोडतो," असे बच्चू कडू यांनी जाहीर केले.
Bacchu Kadu
Bacchu Kaduesakal

Mumbai News : मंत्रिपदासाठी चर्चे असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला आहे. त्यांनी आज त्यांची भूमिका जाहीर केली. बच्चू कडू मंत्रिपदासाठी चांगलेच इच्छुक होते. मात्र शिवसेना-भाजप युतीत राष्ट्रवादीचा प्रवेश झाल्याने बच्चू कडू यांच्या आशा मावळल्या, त्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. (Bacchu Kadu News)

बच्चू कडू यांनी आज भूमिका स्पष्ट केली आहे. "मुख्यमंत्री अडचणीत आहेत, मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मी मंत्रिपदाचा दावा सोडत आहे, हे मी आज जाहीर करतो. मला मंत्रालय दिलंय त्यामुळं मी दावा सोडतो," असे  बच्चू कडू यांनी जाहीर केले.

ठमाझ्या जागी हवं तर आमचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्री पद द्या," अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. 

Bacchu Kadu
Rahul Gandhi Defamation case: शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल गांधींची याचिका मंजूर, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

यापूर्वी खातेवाटप झाला तेव्हा बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. "राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव आणला आणि यशस्वी झाले", असे कडू म्हणाले होते.

शिंदेंचा गुलाम म्हणून काम करेन-

गेली पाच वर्ष मी सरकारमध्ये आहे, यासाठी मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन. आम्हा दोन अपक्ष आमदारांना त्यांनी पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि मला शब्द दिल्याप्रमाणं त्यांनी राज्यमंत्रीपदही दिलं होत.

एकनाथ शिंदे यांनी मला दिव्यांग मंत्रालय दिलं. देशात पहिल्यांदाच असं मंत्रालय तयार झालं. ही माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळं हे दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे. या भेटीसाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेन त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, असे कडू म्हणाले होते.

Bacchu Kadu
Monsoon Session: किरीट सोमय्या प्रकरणी विरोधक आक्रमक, देवेंद्र फडणवीस उचलणार मोठे पाऊल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com