Bacchu Kadu : आता बच्चू कडूंकडून घराणेशाही; बंधू भैय्या कडू निवडणुकीच्या रिंगणात

Bacchu Kadu
Bacchu KaduEsakal

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदार असलेले बच्चू कडू मागील काही दिवसांपासून नाराजीमुळे चर्चेत आहेत. कडू यांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीही व्यक्त केली होती. त्यातच आता बच्चू कडू यांच्यासंदर्भात एक बातमी समोर आली असून बच्चू कडू यांच्या घरातूनही आता घराणेशाही सुरू होणार असं चित्र आहे. वास्तविक बच्चू कडू संघर्ष करून राजकारणात आलेले आहेत. (Bacchu Kadu news in Marathi)

Bacchu Kadu
छत्रपतींच्या अवमानाविरुद्ध बोलणाऱ्या खासदार कोल्हेंचा माईक केला बंद; मनसेने म्हटलं...

बच्चू कडू यांचे बंधू भैय्या कडू सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. चांदूर बाजारमधील बेलोरा ग्रामपंचायत निवडणूक भैय्या कडू लढवणार आहे. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार हे स्पष्ट आहे.

यावेळी भैय्या कडू कडू म्हणाले की, ही निवडणूक गावाच्या विकासासाठी आणि बच्चू कडू यांच्यासाठी महत्त्वाची आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत तत्पर आहोत. या बळावरच आम्ही निवडणूक जिंकू, असा विश्वासही भैय्या कडू यांनी व्यक्त केला आहे.

Bacchu Kadu
मुस्लीम महिलांच्या लग्नाच्या वयाबाबत SCची केंद्र सरकारला नोटीस; आता 4 आठवड्यात...

बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून अपंगांसाठी काम करतात. नव्या सरकारमध्ये बच्चू कडू यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या बंधूंसाठी ग्रामपंचायत निवडणूक सोपी नसणार हे स्पष्ट आहे. कारण ग्रामपंचायत निवडणूक सर्व निवडणुकांपेक्षा अत्यंत खडतर निवडणूक मानली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com