...आणि राज ठाकरेंना आपलं नाव बदलावं लागलं

राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्या अनोख्या बारशाची कहाणी सांगितली.
Raj Thackeray
Raj ThackeraySakal

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी देशभर प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे नावाची दहशत फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात आहेत. परंतु राज ठाकरेंचं मूळ नाव 'राज' नसून 'स्वरराज' होतं हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? स्वतः राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्या अनोख्या बारशाची कहाणी सांगितली.

Raj Thackeray
Photos: राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो पाहिले का?

राज ठाकरे यांच्यावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दिसून येतो. त्यांची भाषणशैली असो किंवा मग व्यंगचित्र काढणं असो, बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक गुण राज यांच्यात प्रतिबिंबित झालेले दिसतात. राज ठाकरे यांचं नाव 'स्वरराज' असं होतं. याच नावाने ते व्यंगचित्र काढत. परंतु एक दिवस बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना नावात बदल करायला सांगितले.

"मी 'बाळ ठाकरे' नावानं कारकीर्द सुरु केली, तूसुद्धा स्वरराजऐवजी 'राज ठाकरे' या नावानं व्यंगचित्र काढ," असं बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं. "तेव्हापासून मी राज ठाकरे नावानं व्यंगचित्र काढायला लावलं, अशापद्धतीने माझ्या नावाचं बारसं झालं," असं राज ठाकरेंनी एबीपी माझावरील 'ऐसपैस गप्पा राजकाकांशी' या कार्यक्रमात सांगितले.

Raj Thackeray
'किआन' अमित ठाकरे; राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ काय?

राज यांनी यावेळी आपल्या शाळेच्या आठवणीही सांगितल्या. मी शाळेत फार हुशार नव्हतो. घरच्यांनी मला फक्त दहावी पास हो, असं सांगितलं होतं. मला फक्त 37 टक्के मिळाले. शाळेत मला चित्रकला विषय सर्वात आवडता होता. याशिवाय मराठी, इतिहास, भूगोल आणि हिंदी विषयही आवडायचे, असंही त्यांनी सांगितले. दरम्यान आपल्या प्रगतीपुस्तकावर नेहमी बाळासाहेबच सही करत,असंही राज ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com