छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्यांना हे शाेभते का : बाळासाहेब थोरात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत भाजप व मोदींवर कडाडून टीका केली आहे.  

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत भाजप व मोदींवर कडाडून टीका केली आहे.  

ते म्हणाले, ''छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपने 'आज के शिवाजी : नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या माध्यमातून मोदींची तुलना छत्रपतींशी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हा प्रकार महाराष्ट्र खपवून घेणार नाही. हे पुस्तक मागे घेवून भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राची माफी मागावी.''

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, शिवस्मारकातही घोटाळा करणाऱ्या भाजपला खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपच्या या खोडसाळपणाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या (ता. १४ जानेवारी रोजी) राज्यभर निषेध केला जाणार आहे. 

भाजप नेते श्याम जाजू म्हणतात, शिवाजी महाराजांमध्ये असणारे गुण मोदींमध्ये...

दरम्यान, मी स्वतः कार्यकर्त्यांसमवेत उद्या मंगळवार, (ता. १४ जानेवारी रोजी) सकाळी ११ वा. टिळक भवन, दादर, मुंबई येथील निषेध आंदोलनात सहभागी होणार आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकरित्यांनी आपल्या जिल्हा व तालुक्यात भाजपच्या विरोधात उद्या निषेध आंदोलन करावे.Balasaheb thorath criticize bjp and narendra modi
 

अनेकांनी व्यक्त केली नाराजी- नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्ती केली. त्यानंतर याबाबत आता छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अन्ननागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही यावरून भाजपवर कडाडून टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb thorath criticize bjp and narendra modi