पंकजांसह सुप्रिया ताई निर्व्यसनी अन्... : बंडातात्या कराडकर

bandatatya karadkar contriversial statement
bandatatya karadkar contriversial statement Sakal

सातारा : बाळासाहेबांबरोबरच (Balasaheb) काही राजकीय लोकांची नावे घेतली. त्यांच्याबद्दल मला कुठलाही वैयक्तिक पूर्वआकस नाही. मी वैयक्तिक त्यांचा कधीही द्वेष करत नाही. त्यांच्याबद्दल मी याठिकाणी माफी मागतो. माझं ही विधाने अनावधानामधून आलं आहे. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करत आहे, असं बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) म्हणाले. (Bandatatya Karadkar Controversial Statement)

bandatatya karadkar contriversial statement
'सुप्रिया सुळे-पंकजा मुंडे दारु पितात'; बंडातात्यांच्या वक्तव्यावर आव्हाड म्हणतात...

मी काही आरोप केले आहेत. ते आरोप पूर्वग्रहदूषित नाही. चारही लोकांची मी क्षमा मागतो. पंकजा ताई आणि सुप्रिया ताई या दोघींचंही वर्तन चांगलं आहे. त्या दोघीही निर्व्यसनी आणि सदाचारी आहेत, असं मी कबूल करतो, असंही बंडातात्या म्हणाले.

वैयक्तिक प्रतिष्ठेला तडा गेला का? -

५० वर्षाच्या जीवनात माझं वैयक्तिक चारित्र्य प्रतिष्ठेचा विषय कधीच केला नाही. काही माणसं मर्यादेचं उल्लंघन करून माझ्यावर आरोप करत असतील. पण, माझ्या जीवनाची मला खात्री आहे. माझ्यावर अनेक आरोप आहेत. पण, मी ते माझ्या प्रतिष्ठेचं कारण समजत नाही, असंही बंडात्यात म्हणाले. काही लोक मी आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करतात. पण, मी कुठल्याही संघटनेचा कार्यकर्ता नाही, असं बंडातात्या टीव्ही ९ मराठीसोबत बोलताना म्हणाले.

बंडातात्या काय म्हणाले? -

नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेली आहेत. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या देखील दारू पितात, असा त्यांनी उल्लेख केला आहे. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारू पित नाही त्याचं नाव सांगा. तसंच आपण नावं घेतली आहेत आणि त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करू शकतो, असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत हे सांगावं, असं खुलं आव्हान देखील त्यांनी दिलं होतं.

महिला आयोगानं घेतली दखल

दरम्यान महिला आयोगानी याप्रकरणाची गंभीर दखल घेत बंडातात्यांवर कारवाई करण्याची नोटीस सातारा पोलिसांना दिली होती. त्यानंतर बंडातात्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बेकायदेशीर आंदोलन करणे, कोविडचे नियम न पाळता आंदोलन करणे, मास्क बाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भडकाऊ भाषण केल्याचीही सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com