Viral Video: बारामती मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशांनी भरलेली कार सापडल्याचा रोहित पवारांचा दावा, व्हिडिओ केला शेअर

Rohit Pawar vs Ajit Pawar: या 11 मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेचा मानला जात असलेल्या बारामतील लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात मतदानाच्या आदल्या रात्री पैशांनी भरलेली एक कार सापडली असल्याचा दावा केला जातोय
Baramati Lok Sabha Constituency Car Found With Money Before Polling Day For Loksabha Election 2024 rohit pawar claims
Baramati Lok Sabha Constituency Car Found With Money Before Polling Day For Loksabha Election 2024 rohit pawar claimsEsakal

लोकसभा निवडणुकांसाठी आज देशासह महाराष्ट्रातही मतदान होत आहे. यंदाच्या निवडणुकीत हा मतदानाचा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे.

या 11 मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेचा मानला जात असलेल्या बारामतील लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात मतदानाच्या आदल्या रात्री पैशांनी भरलेली एक कार सापडली असल्याचा दावा केला जातोय. विषेश म्हणजे नागरिकांनीची ही कार अडवून त्याचे व्हिडिओ चित्रित केले आहेत.

दरम्यान ही पैशांनी भरलेली कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांची असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. (Baramati Lok Sabha Constituency Car Found With Money Before Polling Day For Loksabha Election 2024)

दरम्यान या घटनेची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट दावे करण्यात येत आहेत. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी याबाबत सोशल एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत पैसे वाटणारे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे असल्याचा आरोप केला आहे.

Baramati Lok Sabha Constituency Car Found With Money Before Polling Day For Loksabha Election 2024 rohit pawar claims
Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही पैसे असलेली कार अडवत तिची तोडफोड केली. तसेच तीन ते चार जणांना मारहाण केली. दरम्यान कार्यकर्त्यांनी भोर तालुक्यातून पकडलेली 3 वाहने पोलिसाच्या ताब्यात दिली आहेत.

या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Baramati Lok Sabha Constituency Car Found With Money Before Polling Day For Loksabha Election 2024 rohit pawar claims
PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधूदुर्ग अशा प्रतिष्ठित ठरत असलेल्या मतदारसंघांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com