Sharad Pawar : राष्ट्रवादीची चोरी ही होलसेल चोरी

ज्या पक्षाच्या नावाने मते मागितली, निवडून गेले, ज्यांच्या नावामुळे निवडून गेला, त्यांचीच फसवणूक केली.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit PawarSakal

बारामती - ज्या पक्षाच्या नावाने मते मागितली, निवडून गेले, ज्यांच्या नावामुळे निवडून गेला, त्यांचीच फसवणूक केली, आमचा पक्ष आणि घडयाळ या चिन्हाची होलसेल चोरी तुम्ही केली, इतक्या दिवस लोक पक्ष सोडून जात होते आज मात्र पक्षच चोरुन नेल्याची घणाघाती टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून केली.

बारामतीतील शेतकरी कष्टकरी कामगार मेळाव्यात बोलताना आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हुकुमशाहीच्या दिशेने देशाला नेत असल्याची जोरदार टीका केली.

शरद पवार म्हणाले, मोदींना घटनाच बदलायची आहे, त्या साठी त्यांना मत द्यायचे का याचा सर्वांनी विचार करावा. जे मोदी नवीन संसदेत येताना साष्टांग दंडवत घालतात, तेच मोदी एक महिन्याच्या संसदेच्या अधिवेशनात फक्त एक दिवस आमच्या सभागृहात येतात, काही मिनिटे बोलतात आणि निघून जातात, याचाच अर्थ त्यांचा संसदीय लोकशाहीवर किती विश्वास आहे हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

पंतप्रधान बारामतीत आले माझ बोट धरुन राजकारणात आल्याच सांगितल, संसदेत भेटतात तेव्हा प्रेमाने बोलतात, पण सत्ता भल्यासाठी वापरायची असते याचा विसर त्यांना पडला, हुकूमशाही प्रमाणे सत्ता वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी मोदींवर केला.

जे नेते देशाचे हित साध्य करु शकत नाही तेथे बदलाची गरज आहे, त्या मुळे या निवडणूकीत मतदारांनीच हा बदल घडविणे गरजेचे आहे.

गेल्या निवडणूकीत घड्याळ चिन्ह होत पण होलसेल चोरी झाली आणि पक्षच चोरुन नेला अस मिश्किलपणे सांगत त्याने नाउमेद व्हायच नाही, नवीन पक्ष तयार केला, नवीन चिन्ह मिळाल आणि नवीन लोकांना सोबत घेऊन आता नव्या उमेदीने वाटचाल करायची ठरवल्याच ते म्हणाले.

एका कामगाराने युनियन तयार करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला कामावरुन काढून टाकण्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर मला आठवण करा, त्याला कामावर परत कसे घेत नाही ते मी बघतो, मुलभूत हक्कांवर गदा येऊ देणार नाही, अशा वेळेस कामगारांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

कामगारांच्या कार्यासह कार्यक्रमांसाठी कामगार भवन उभारु, त्या साठी तुम्ही थोडी वर्गणी काढा, उद्योगपतींना मी खर्च करायला सांगतो, इथे जमिन द्यायला एमआयडीसीला मी सांगतो, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com