esakal | कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत - उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray

पुन्हा लॉकडाउनचे वृत्त चुकीचे
‘‘काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमानसात संभ्रम निर्माण करतात, त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या  पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे,’’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत; पण लॉकडाउन उठवतो आहोत, याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत - उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - आपत्तीकाळात आरोग्यसुविधा उपलब्ध असल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. सरकार राज्यात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहे. तरीदेखील नागरिकांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घ्यावी. शारीरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे या सवयी अंगीकारून खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ कोविड केअर सेंटर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचे ऑनलाइन लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून झाले. या वेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचीही या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती होती.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोनाबधित

ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या लढाईत सर्वच योद्धे प्रामाणिकपणे लढत आहेत. या आपत्तीकाळात लढण्यासाठी आयुधांची आवश्यकता आहे. ही आयुधे शासन राज्यभरात उपलब्ध करून देत आहे. मार्च २०२० पासून आजपर्यंत सरासरी दररोज एक विषाणू प्रयोगशाळांची उभारणी राज्यात होते आहे. लवकरच राज्यात शंभरहून अधिक विषाणू तपासणी प्रयोगशाळा होतील.’’

"एमएसएमई' लवकरच सुरू करणार ही योजना, नितीन गडकरींनी केली घोषणा

चिकलठाणा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पंधरा ते वीस दिवसांत २५६ खाटांचे कोविड रुग्णालय तयार केले आहे; तसेच विद्यापीठातील कोविड विषाणू संशोधन प्रयोगशाळाही तयार केली आहे. हे रुग्णालय मुंबईतील कस्तुरबा, पुण्यातील नायडू संसर्गजन्य रुग्णालयाप्रमाणे कायमस्वरूपी करावे.
 -सुभाष देसाई, पालकमंत्री व उद्योगमंत्री

loading image