Kasba By Election: कसब्याचा गड राखण्यासाठी भाजपचे संकटमोचक मैदानात; घेतली गुप्त बैठक

मविआच्या उमेदवारासह या निवडणुकीत अनेक जण लढणार असल्यानं भाजपला मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
Kasba Bypoll Election 2023 News Updates
Kasba Bypoll Election 2023 News Updatesesakal

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासह इतर अनेक जण लढणार असल्यानं भाजपला मोठं आव्हान निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर कसब्याचा गड राखण्यासाठी भाजपचे संकटमोचक अर्थात गिरीश महाजन मैदानात उतरले आहेत. (For win Kasba By Election BJP troubleshooter Girish Mahajan takes secret meeting)

Kasba Bypoll Election 2023 News Updates
Amit Shah: केंद्रीय तपास एजन्सीजचा खरंच गैरवापर होतोय का? शहांनी स्पष्टचं सांगितलं

कसबा निवडणुकीसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी काल भाजप कोअर कमिटीची गुप्त बैठक घेतली. या बैठकीला मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते. कसब्याची पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकण्यासाठी भाजपकडून बडे मंत्री मैदानात उतरवण्यात येणार आहेत.

Kasba Bypoll Election 2023 News Updates
BBC IT Raid: बीबीसीवरील छापेमारीनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ; वाचा काय म्हणताहेत नेटकरी

यासंदर्भातच भाजपच्या पुणे शहराच्या कोअर कमिटीला महाजन आणि चव्हाण यांनी केले मार्गदर्शन. यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती कशी असेल यावरच प्रामुख्यानं चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com