राज्याचे अर्थमंत्री का उपस्थित नव्हते? भागवत कराड यांचा पवारांवर निशाणा

Bhagwat karad on Ajit Pawar
Bhagwat karad on Ajit Paware sakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पपूर्व चर्चा करण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठक (Pre-Budget Meeting) घेतली. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातून कोणीही सहभाग घेतला नाही. याबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Minister Bhagwat Karad) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्य सरकारवर टीका केली आहे.

Bhagwat karad on Ajit Pawar
कोरोना निर्बंधाबाबतचा एकमताने निर्णय घेणार : अजित पवार

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या 2 बैठकांसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, दोन बैठकांना मुख्यमंत्री किंवा राज्याचे अर्थमंत्री कोणीही उपस्थित नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही, असं समजलं. पण, राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित का राहू शकले नाहीत? असा सवाल भागवत कराड यांनी उपस्थित केला आहे. तसेच बैठकीला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व उपस्थित असते तर राज्यासाठी फायदेशीर ठरले असते, असंही मंत्री कराड म्हणाले .

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. यामध्ये अनेक राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सहभागी झाले होते. सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा द्यावा, अशी विनंती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली. केंद्रीय करामध्ये राज्याच्या भाग वाढवावा आणि दिल्ली केंद्रीय करामधून जास्त पैसा द्यावा, अशी मागणी दिल्लीचे अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली. तसेच सर्व पिकांची किमान आधारभूत किंमतीमध्ये खरेदी करावी, असा सल्ला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सीतारामन यांना दिला. वीजेच्या किंमती ४० टक्क्यांनी वाढ झाली असून बेरोजगारीचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात याबाबत तरतुदी कराव्या, अशीही मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com