"अधिवेशन संपताच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार, तेव्हा होणार आमच्या नावाचा विचार"

Bharat Gogavale
Bharat GogavaleSakal

मुंबई : राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या गटातील ९ आणि भाजपच्या ९ आमदारांना मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. दरम्यान सेनेशी बंड करून शिंदे गटात गेलेल्या ९ आमदारांना सोडता बाकीच्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी दिली आहे.

राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रतोद भरत गोगावले, संजय शिरसाठ, बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा होती पण त्यांना या टप्प्यात संधी मिळाली नाही. दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विरोधकांची तोंडं बंद झाली आहेत. येत्या १७ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन संपलं की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार आहे." असं भरत गोगावले म्हणाले आहेत.

संजय राठोड यांना दिलेल्या मंत्रिपदावरून टीका सुरू झाली असून त्यावर बोलताना गोगावले म्हणाले की, "राठोड हे त्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर आले आहेत. त्यांना कार्टाने क्लीनचीट दिलेली आहे त्यामुळे त्यांना आम्ही मंत्रिपद दिलं आहे. जर कुणी टीका करत असेल तर त्यांना करू द्या, पण आम्हाला काम करायचंय, आम्ही काम करत राहणार." असं गोगावले म्हणाले. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये माझ्यासारख्यांचा, बच्चू कडू यांच्यासारख्यांचा विचार केला जाईल असंही ते म्हणाले आहेत.

Bharat Gogavale
"संजय राठोडांना मंत्री केल्याचा आनंद" - सुप्रिया सुळे

शिंदे गटातील या नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

तानाजी सावंत (Tanaji Sawant), उदय सामंत (Uday Samant), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), दादा भुसे (Dada Bhuse), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), संजय राठोड (Sanjay Rathod), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

भाजपमधून या मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

गिरीश महाजन (Girish Mahajan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), सुरेश खाडे (Suresh Khade), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), अतुल सावे (Atul Save), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), मंगलप्रभात लोढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com