कोरोना मृतांचा आकडा राहुल गांधींनी आणला कुठून ? भारती पवार यांचा सवाल

'कोळसा प्रश्नावरून केंद्र सरकारवर खापर फोडणे योग्य नाही.'
Rahul Gandhi And Bharati Pawar
Rahul Gandhi And Bharati Pawaresakal

उस्मानाबाद : कोरोना काळात देशभरात ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी सांगत आहेत. त्यांनी हा आकडा आणला कुठून, हे त्यांनी केंद्राला सांगावे, असा सवाल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी सोमवारी उस्मानाबाद (Osmanabad) (ता. १८) येथे केला आहे. कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे देशभरात सुमारे ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. पवार म्हणाल्या, देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पोर्टलवर दररोज दिली जाते. (Bharati Pawar Ask Rahul Gandhi For Corona Death Numbers)

Rahul Gandhi And Bharati Pawar
UPSC च्या नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...

ही आकडेवारी गावागावांत भरली जाते. त्यानंतर त्या-त्या राज्यांतून आकडे केंद्राकडे येतात. ते पोर्टलवर तातडीने अपडेट होतात. असे असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हा आकडा आणला कुठून?, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

Rahul Gandhi And Bharati Pawar
थोडे मनोरंजन व्हायला नको का ? सुप्रिया सुळे यांची राज यांच्या सभेवर टीका

वीजेचे खापर केंद्रावर नको

राज्यात विजेची समस्या भेडसावत आहे. कोळसा प्रश्नावरून केंद्र सरकारवर खापर फोडणे योग्य नाही. राज्य शासनाने योग्य नियोजन केले तर निश्चित हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा उपरोधिक सल्लाही डॉ. पवार यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com