Uddhav Thackrey
Uddhav ThackreyEsakal

Uddhav Thackrey: 'उठा' तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ, ठाकरे गटाचा मोठा नेता शिंदे गटात करणार प्रवेश; प्रवक्त्याचे सूचक ट्विट

काही दिवसांमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी पक्षप्रवेश केला
Published on

एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार आणि खासदार यांच्यासोबत शिवसेनेत बंड केलं आणि शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थक यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला गळती लागली आहे. तर गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी काही नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Latest Marathi News)

तर आजही 12 वाजण्याच्या सुमारास ठाकरे गटातून मुंबईतील आणखी पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा केला आहे. शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी याबाबत सुचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आज कोणता नेता ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackrey
KCR in Maharashtra : महाराष्ट्रात जेवणावळी अन् दिल्लीत पक्ष फुटला…; केसीआर यांनी उद्धव ठाकरे गटाचा टोला

ठाकरे गटातून मुंबईतील आणखी पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आज 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्ष प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. मात्र पक्षप्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.(Latest Marathi News)

Uddhav Thackrey
Pune: सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला; MPSCच्या तरुणांनी वाचवलं

नरेश म्हस्के यांचं ट्विट काय आहे?

आज 'उबाठा'चा आणखी, एक मोहरा कमी होईल, खऱ्या शिवसेनेत येऊन, विचारांशी निष्ठा ठेवील, नाहीच राहू शकत तिथे, खरे कार्यकर्ते आता, स्मशान शांतता पसरणार तिकडे, मारोत कुणी काही बाता, सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार, 'उठा' तुमच्यावर लवकरच, झोपायची वेळ येणार, ED चा फेरा ठेपलाच आहे, येऊन तुमच्या दारी, म्यान करून ठेवा, तुमच्या गंजल्या तलवारी(Latest Marathi News)

Uddhav Thackrey
Abu Azmi Threat Call: '3 दिवसांचा वेळ आहे! अबू आझमी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर आली जीवे मारण्याची धमकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com