अंगणवाड्यांमध्ये लवकरच मोठी पदभरती! सोलापूर जिल्ह्यात होईल १०७३ पदांची भरती; ७२९ मिनी अंगणवाड्यांचे होणार श्रेणीवर्धन

मोठ्या अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत असते तर त्याठिकाणी एक सेविका व मदतनीस नेमली जाते. मिनी अंगणवाड्यांमध्ये केवळ सेविकाच कार्यरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ७२९ मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे.
mantralay
mantralaysakal

सोलापूर : जिल्ह्यात ९३२ मिनी अंगणवाड्या असून त्यातील ७२९ अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. तसा प्रस्ताव महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्या प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये मदतनीस भरल्या जातील. उर्वरित अंगणवाड्यांमध्ये देखील १०० मदतनीस व २०७ सेविकांची पदे रिक्त आहेत. त्यांची भरती प्रक्रिया काही दिवसांत सुरू होणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची भरती होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या कार्यरत असून त्याअंतर्गत सव्वालाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यामध्ये तीन हजार १५३ मोठ्या तर ९२३ मिनी अंगणवाड्या आहेत. मोठ्या अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत असते तर त्याठिकाणी एक सेविका व मदतनीस नेमली जाते. मिनी अंगणवाड्यांमध्ये केवळ सेविकाच कार्यरत आहे.

राज्यातील जवळपास १३ हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ७२९ मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी कार्यरत सेविकेला पदोन्नती मिळेल आणि त्याठिकाणी मदतनीस नेमली जाईल. दुसरीकडे त्या अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत देखील असेल. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेकडील अंगणवाड्यांमध्ये ३७ पर्यवेक्षिका (सुपरवायझर), २०७ सेविका व ८२९ मदतनीस, अशी पदे रिक्त आहेत. या पदभरतीला काही दिवसांत प्रारंभ होणार असून रे नगर प्रकल्पातील ४० मिनी अंगणवाड्यांमध्येही सेविकांची भरती होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रिक्त पदांची भरती, मिनी अंगणवाड्यांमध्ये श्रेणीवर्धन अशा विविध मागण्या काही दिवसांपूर्वीच्या आंदोलनावेळी करण्यात आल्या होत्या. त्याची टप्प्याटप्याने पूर्तता केली जात आहे.

एकूण रिक्त पदे

  • पर्यवेक्षिका

  • ३७

  • सेविका

  • २०७

  • मदतनीस

  • ८२९

  • एकूण

  • १,०७३

‘रे नगर’मधील अंगणवाडीचा पॅटर्न राज्यस्तरावर

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी रे नगर प्रकल्पातील एका अंगणवाडीला भेट दिली. त्यावेळी अंगणवाडीच्या भिंतीवरील चित्रे, रंगकाम व अंगणवाडीतील विविध चित्रे पाहून कौतुक केले. अशाच अंगणवाड्या राज्यभरात व्हाव्यात, असे त्यांनी संबंधित विभागाला आदेश दिले. त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून व सरकारकडूनही वाढीव निधी देऊन यापुढे नवीन अंगणवाड्या बांधल्या जाणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील उपसचिवांनी सोलापूरच्या रे नगरातील अंगणवाडीची रचना, खर्च याबद्दल सविस्तर माहिती मागविली आहे. आदर्श अंगणवाडीचा हा पॅटर्न आता राज्यभर जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com