

Land Partition Measurement
esakal
Maharashtra News : शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता अत्यंत कमी दरात म्हणजे केवळ प्रति पोटहिस्सा २०० रुपयांत होणार आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्णयाची माहिती सांगली जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला प्राप्त झाली असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात आजअखेर अशा मोजणीसाठी एकही अर्ज आलेला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.