
solapur city
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : जीवनसाथी ॲपवर पोलिस उपनिरीक्षक असल्याचे भासवून तरुणाने अनेक तरुणींना फसविले होते. सोलापूर शहर सायबर पोलिसांनी वैभव दिपक नारकर (वय ३१) या संशयितास मुंबईतून पकडून आणले आहे. त्याने सोलापूर शहरातील एका तर मुंबई, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यांमधील सुमारे ६० तरुण-तरुणींना त्याने लाखो रुपयाला फसविल्याचे समोर आले आहे.
लग्नासाठी आवडीचा पती किंवा पत्नी मिळावी म्हणून जीवनसाथी ॲपवर अनेकजण नोंद करतात. त्यावर आपण पोलिस उपनिरीक्षक असल्याचे प्रोफाईल त्याने तयार केले होते. त्या ॲपवर त्याने पोलिसांच्या खाकी गणवेशातील फोटो देखील टाकले होते. मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गोविळ (ता. लांजा) असलेला वैभव सध्या मुंबई, नायगाव येथे रहायला आहे. त्याने सोलापूर शहरातील एका तरुणीशी ओळख करून तिच्याशी बोलणे सुरू केले. काही दिवस गेल्यावर त्याने १९ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात त्या मुलीकडून मावस भाऊ व मावशीचा अपघात झाला म्हणून आणि ते मयत झाल्याचे सांगून ६३ हजार रुपये हडपले. त्या मुलीच्या तक्रारीनंतर सोलापूर शहर सायबर पोलिस त्याचा शोध घेत होते.
पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या नेतृत्वातील पोलिस उपनिरीक्षक नागेश इंगळे, पोलिस अंमलदार कृष्णात जाधव, निलेश गंगावणे, नितीन आसवरे, मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने संशयिताला मुंबईतून अटक केली.
नोकरी लावणे अन् विवाहाचे आमिष
तोतया पोलिस उपनिरीक्षक वैभव नारकर याने जीवनसाथी ॲपवरून सात-आठ मुलींना विवाह करतो म्हणून नादी लावले होते. त्यांच्याकडूनही त्याने पैसे उकळले. याशिवाय त्याने ४० ते ५० मुलांशी संपर्क करून नोकरीचे आमिष दाखविले होते. मंत्रालय, पोलिस दलात मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून त्याने त्यांना नोकरीचे आमिष दिले होते. त्यांच्याकडूनही संशयिताने लाखो रुपयाला गंडा घातल्याची बाब तपासात समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.