Sharad Pawar reacting to the NDA’s Bihar election victory and raising concerns about the alleged impact of the ₹10,000 pre-poll scheme on women voters.
esakal
Bihar Election Results : दहा हजार रूपयांच्या योजनेमुळे बिहारमध्ये एनडीए सत्तेत, निवडणूक आयोगाने विचार करावा; शरद पवार यांची प्रतिक्रिया
Summary
बिहार निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याची शरद पवारांनी नोंद घेतली.
भाजपच्या १० हजार रुपयांच्या योजनेने परिणाम झाला असावा, असे ते म्हणाले.
निवडणुकीआधी पैसे वाटणे ही चिंतेची व पारदर्शकतेला धक्का देणारी बाब असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशाचे लक्ष लागलेल्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या दहा हजार रुपयांच्या योजनेचा परिणाम झाला असावा. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीआधी अधिकृतपणे पैसे वाटणे ही चिंतेची बाब आहे. प्रत्येक महिलेला दहा हजार देणे ही लहान गोष्ट नाही. पैसे देऊन निवडणुका लढवणे हे पारदर्शकपणाचे लक्षण आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला असे शरद पवार म्हणाले.

