भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर; गोयल, बोंडेंना संधी

bjp announces piyush goyal and anil bonde name as rajya sabha candidates
bjp announces piyush goyal and anil bonde name as rajya sabha candidates

राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राज्यात वातावरण तापलं आहे, यादरम्यान भाजपकडून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून तिसर्‍या जागेसाठी मात्र भाजपकडून कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. (bjp announces piyush goyal and anil bonde name as rajya sabha candidates)

भाजपकडून आज देशभरातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून दोन नावे जाहीर झाली आहेत. यादरम्यान तिसरा उमेदवार कोण असेल याबाबत अजून सस्पेंस कायम ठेवण्यात आला आहे. तिसरा उमेदवार अजून दिला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांना दुसरी संधी न देता विदर्भातील चेहरा अनिल बोंडे यांना यावेळी संधी देण्यात आली. पियूष गोयल यांचे नाव देखील चर्चेत होते.

bjp announces piyush goyal and anil bonde name as rajya sabha candidates
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

दरम्यान तिसर्‍या जागेसाठी उमेदवाराचे नाव जाहीर झाले नाही तर राज्यसभेच्या सहा जागेसाठी सहा उमेदवार असतील आणि ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com