esakal | महाविकासआघाडीला घेरण्यासाठी भाजपची खेळी; राणेंना देणार 'ही' जबाबदारी?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP appointed may narayan rane as MLC in maharashtra

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषदेत पाठविण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत भाजपकडून मात्र कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

महाविकासआघाडीला घेरण्यासाठी भाजपची खेळी; राणेंना देणार 'ही' जबाबदारी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी त्यांचे विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधानपरिषदेत पाठविण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत भाजपकडून मात्र कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर आज (ता.२८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर शपथ घेतल्यानंतर नवे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर सरकारला घेरण्याचा एक प्रयत्नही भाजप सोडत नसल्याचे दिसत आहे.

साहेब हा पॅटर्न देशभर राबवा; पवारांना बारामतीतून आला फोन

काल (ता.२८) सरकार अस्तित्वात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच नव्या सरकारवर प्रहार करण्यास सुरवात केली आहे. फडणवीस म्हणाले, नवे सरकार मराठवाडा आणि विदर्भाकडे लक्ष देईल अशी अपेक्षाही त्यांनी नवीन सरकारकडे व्यक्त केली होती. भाजपने आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच महाराष्ट्र विकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने नवी खेळी खेळली आहे.

Video : काम बाजूला ठेवा पण पोलिसाचा डांस पहाच

नारायण राणे यांच्या राजकीय प्रवासाला शिवसेनेतूनच सुरवात झाली आहे. १९९५ ला राज्यात शिवसेना-भाजपचे युती सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी यांनी शपथ घेतली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. काही काळनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर मात्र, राणे आणि उद्धव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आणि राणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. शिवसेनेला रामराम केल्यानंतर राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायम तणाव राहिलेला आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार

दरम्यान, काल (ता. २८) शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.

loading image