साहेब, हा पॅटर्न देशभर राबवा; पवारांना बारामतीतून आला फोन

मिलिंद संगई
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यस्तरावर राबविलेल्या पॅटर्न आता साहेब तुम्ही देशभर राबवा, अशी हाक बारामतीकरांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिली आहे. तसे फोन कॉलही बारामतीमधून शरद पवारांना कार्यकर्त्यांनी केले आहेत.

बारामती : महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यस्तरावर राबविलेल्या पॅटर्न आता साहेब तुम्ही देशभर राबवा, अशी हाक बारामतीकरांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिली आहे. तसे फोन कॉलही बारामतीमधून शरद पवारांना कार्यकर्त्यांनी केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे फोनवरून अभिनंदन केले. त्यानंतर सदाशिव सातव यांनी या नवीन प्रयोगाबद्दल शरद पवार यांचे अभिनंदन करीत त्यांना हा प्रयोग आता देशाच्या कानाकोपऱ्यात राबविला पाहिजे, अशी सूचना केली.

चिकन पोपटी खायचंय? मग हॉटेल कांजीला भेट द्याच

शरद पवार यांनी देखील सदाशिव सातव यांच्याकडे बारामतीत याबाबत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत असे विचारले. बारामतीत नागरिकांना या नवीन प्रयोगाचे कौतुक वाटत असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना एकत्रित या सत्तेत सहभागी झाल्याचा वेगळा आनंद आहे, असे सातव यांनी शरद पवार यांना सांगितले.

आता बारामतीला येणार खऱ्या अर्थाने अच्छे दिन 

बारामतीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करीत या नवीन प्रयोगाचे स्वागत केल्याची माहिती शरद पवार यांना सदाशिव सातव यांनी दिली . राज्याच्या राजकारणात हा वेगळा पॅटर्ना राबवला आहे तसाच पॅटर्न आगामी काळात देशभरातील विविध राज्यांमध्ये राबविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती देखील पवार यांना सातव यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati Ex Mayer Sadashiv Satav Call Sharad pawar for Congratulate