बंद आणि विरोध यांचा 'धंदा'; त्यावरच गोळा होतो 'चंदा'! - शेलार

ashish shelar
ashish shelaresakal

मुंबई : बंद आणि विरोध यांचा “धंदा” गोळा होतो त्यावरच “चंदा”! “बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला (mumbai) बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित”बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले” महाराष्ट्र बंदवरुन (maharashtra bandh) भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीवर (mahavikas aghadi) हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्ष भाजपने बंदमध्ये सहभागी होऊ नये

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रात आज सत्ताधारी सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदचा एल्गार पुकारला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र विरोधी पक्ष भाजपने बंदमध्ये सहभागी होऊ नये, असं आवाहन करत शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हटलंय आशिष शेलारांनी ट्विटमध्ये?

“बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित”बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले”

“एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय.. कोस्टल रोडला विरोध…नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध.. मेट्रोचेही हे विरोधकच.. हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा “धंदा” गोळा होतो त्यावरच “चंदा”!

आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद, ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल, आई दुर्गामाते जनतेला दे “बळ”! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!, अशा शब्दात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय.हल्ला केला आहे.

ashish shelar
Maharashtra Bandh : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी मनसेचं संरक्षण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com