
Bhagatsingh Koshyari : चंद्रकांत पाटलांकडून कोश्यारींची पाठराखण; म्हणाले, 'राज्यपाल शिवेनरीवर…'
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायाला मिळाले. यांनतर राज्यपाल कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल शिवेनरी वर चालत गेले, तुम्ही कधी गेला आहेत का चालत? असा सवाल केला आहे.
भाजपचे नेते पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवराय यांचा अपमान कोणी करू शकत नाही. त्यांच्या मुळे आज आपण उभे आहेत. तसेच भगतसिंह कोश्यारी यांची बाजू घेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यपाल शिवेनरी वर चालत गेले, तुम्ही कधी गेला आहेत का चालत? हिम्मत असेल तर ते आधी पायी चढा आणि मग भक्ती दाखवा, असे म्हटले आहे.
या वयात राज्यपाल पायी चालत शिवनेरीला गेले. त्यांच्या मनात का महाराज यांच्या बद्दल काही असेल? ज्या माणसाच्या मनात महाराजांबद्दल मनात आदर आहे, त्यांच्या एका वाक्याला एवढा का विरोध आहे, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.
उदयनराजे आमचे नेते आहेत, त्यांना हाथ जोडून विनंती आहे. ज्या राज्यपाल यांनी पायी जाऊन दर्शन घेतले त्यांच्या कडून काही बोलले असतील तर माझी विनंती आहे की हा विषय संपवा, असे अवाहन देखील त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना केले आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात राज्यपालांविरोधात संतप्त भावना आहे. तसंच अनेक राजकीय नेत्यांनीही राज्यपाल कोश्यारींना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
पुणेकरांना सामान पाणी मिळेल
गळती थांबेल आणि पुणेकरांना सामान पाणी मिळेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. काही लोकं समाधानी नाही हे नुसतं बोलण्यासाठी कारण आहे. अनेक सोसायट्यांमध्ये टाक्यांमध्ये गळती आहे. मी प्रस्ताव मांडतो आहे २५ टक्के तुम्ही, २५ टाके आमदार निधी मधून करा आणि २५ टक्के नगरसेवक. अधिकारी तेच होते जेव्हा दादा होते, २०१४ ते २०१९ दादाच होते त्यावेळी तुम्हाला प्रश्न सोडवता आला नाही का? असा सवाल त्यांनी केला.