'अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेते करावे का?' चंद्रकांत पाटलांनी दिलं महापौरांना उत्तर

Mumbai Mayor Kishori Pednekar-Chandrakant patil
Mumbai Mayor Kishori Pednekar-Chandrakant patile sakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गैरहजर होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याकडे जबाबदारी सोपवावी असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते. त्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला होता. याबाबत आता चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai Mayor Kishori Pednekar-Chandrakant patil
अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेते करावे का?

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ''मुंबईच्या महापौरांचा मला परिचय नाही. त्यांच्यावर बोलण्याची माझी इच्छा नाही. त्यांनी केलेलं वक्तव्यं अत्यंत बालिश आहे. आजारी असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात यायचा हट्ट धरू नये. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर जबाबदारी सोपवावी असं माझं म्हणणं होतं''. मुंबईच्या महापौरांनी असं वक्तव्य करायला देवेंद्र फडणवीस आजारी आहेत का? झोपलेले आहेत का? ते काम करू शकत नाही का? राजकारण करायचं म्हणून काहीही बोलतात, असंही पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना आराम मिळावा, यासाठी प्रार्थना करतो. पण, त्यांनी आजारी असताना अधिवेशनात येण्याचा हट्ट धरू नये. मुख्यमंत्री असताना अशा अनेक घटना घडत असतात त्याचं उत्तर खुद्द मुख्यमंत्र्यांना द्यावं लागतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सतत सावध असायचे. कोणालातरी जबाबदारी सोपवून जायचे. एल्फिस्टन पूल कोसळसला तेव्हा ते विदेशात होते. पण, त्यांनी तत्काळ फ्लाईट पकडून पहाटे मुंबईत हजेरी लावली होती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या होत्या? -

माझे संस्कार सांगतात इतक्या मोठ्या व्यक्तीवर मी बोलू नये. पण ते एक पत्नी म्हणून रश्मी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवणार का? असे म्हणत आहेत. मग ते अमृता देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देणार का? हे पहिले त्यांना विचारले पाहिजे. कारण अमृता फडणवीस या अधिक चर्चेत असतात. रश्मी ठाकरे या कधीही राजकीय चर्चेत नसतात. तरीही रश्मी ठाकरेंचे नाव का घेतले जाते? तुम्ही स्त्रियांचे हनन करता आणि आदर करतो असं सांगता, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
aaple sarkar seva kendra
Marathi News Esakal
www.esakal.com