Chitra Wagh News : राज्यातील बालमृत्यूंना माताच जबाबदार; चित्रा वाघ यांंचे अजब विधान

नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूंंबाबत विचारलेल्या प्रश्नावर चित्रा वाघ बोलत होत्या.
Chitra Wagh
Chitra Waghesakal

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणी विरोधकांकडून राज्यातील आरोग्य सेवा व्हेंटीलेटरवर असल्याचा आरोप केला जात आहे. शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नवजात बालकांची संख्या देखील मोठी होती.

दरम्यान या घटनेनंतर सर्व स्तरातून राज्यातील सरकारवर टीका केली जात आहे. मात्र या टीकेदरम्यान सत्ताधारी पक्ष भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. सरकारने दिलेल्या गोळ्या गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नाहीत, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे .

सरकारकडून राज्यात गरोदर महिलांना गोळ्या दिल्या जातात, पण माता गोळ्या घेत नाहीत त्यामुळे बालमृत्यू होतात असं विचीत्र विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे.दरम्यान त्यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत.

Chitra Wagh
"मुलींना लखपती करणार ते खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार"; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय!

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंबाबत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, लहान मुलांना ज्या पेटीत ठेवतात तिथे खूप माता बसल्या होत्या, त्यांच्याशी मी बोलले. गोळ्या दिल्या जातात पण आम्ही खात नाहीत. पोषण आहार दिला जातो, तो कधी खातो तर कधी खात नाही असं त्यांनी सांगितलं.

डॉक्टरांनी घ्या म्हणून सांगितलेल्या गोळ्या घेतल्या असत्या तर मुल तंदरुस्त झालं असतं. आज तुमच्या कुशीत असतं असं आम्ही त्यांना सांगितलं. आपण इथपर्यंत देऊ शकतो आपण गिळायला देऊ शकत नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Chitra Wagh
Israel-Hamas Conflict : इस्रायलवरील हल्ल्यानंतर PM नेतन्याहू यांचा हमासला गंभीर इशारा; म्हणाले, युद्धाचे परिणाम...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com